चार जाहीरातदारांनी सादर केले स्ट्रक्चरल ऑडीटचे अहवाल
By अजित मांडके | Updated: May 21, 2024 15:55 IST2024-05-21T15:55:27+5:302024-05-21T15:55:41+5:30
ठाणे महापालिका हद्दीत होर्डींगजे जाळे विस्तारले गेले आहे. मुंबईत झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेला या होर्डींगजवर कारवाई करण्याची जाग आली आहे.

चार जाहीरातदारांनी सादर केले स्ट्रक्चरल ऑडीटचे अहवाल
ठाणे : मुंबईत होर्डींग पडून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेला जाग आली आहे. त्यानुसार शहरातील होर्डींग जाहीदारदारांनी ८ दिवसात स्ट्रक्चरल आॅडीट करावेत असे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ४ जाहीरातदारांनी ५० होर्डींगचे स्ट्रक्चरल आॅडीटचे अहवाल सादर केले आहेत. मात्र उर्वरीत होर्डींगचे अद्यापही अहवाल सादर झालेले नाहीत. संबधींतानी वेळेत अहवाल सादर केले नाहीत तर मात्र नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा महापालिकेच्या जाहीरात विभागाने दिला आहे.
ठाणे महापालिका हद्दीत होर्डींगजे जाळे विस्तारले गेले आहे. मुंबईत झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेला या होर्डींगजवर कारवाई करण्याची जाग आली आहे. मात्र तरी देखील महापालिकेकडून म्हणावी तशी पावले अद्यापही उचलण्यात आलेली नाहीत. शहरात आजही ९० च्या आसपास ओव्हरसाईज होर्डींग आहेत. मात्र त्याकडे पुन्हा एकदा काना डोळा करण्यात आल्याचेच चित्र आहे. असे असले तरी महापालिकेने मागील आठवड्यात बैठक घेऊन शहरात असलेल्या २९४ होर्डींगजे स्ट्रक्चरल आॅडीट करण्याचे आदेश संबधीत जाहीरातदारांना दिले होते. तसेच त्याचा अहवाल आठ दिवसात सादर करावा असेही सांगण्यात आले होते.
परंतु त्यानंतरही महापालिकेकडे आठ दिवसात अवघ्या ४ जाहीरातदारांनी ५० होर्डींगजे स्ट्रक् चरल आॅडीट जाहीर केले असल्याची माहिती महापालिकेच्या जाहीरात विभागाने दिली आहे. उरलेल्यांनी देखील लवकरात लवकर अहवाल सादर करावा असे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे महापालिकेने शहरातील ओव्हर साईज तसेच अनाधिकृत होर्डींगचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश प्रभाग समितीनिहाय सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांनी सर्व्हे देखील सुरु केला आहे. त्यापैकी चिखलवाडी येथील होर्डींग काढून टाकला आहे. मात्र दुसरीकडे कळवा नाक्यावरील होर्डींग कायम ठेवण्यात आले आहे. त्यावर कोणाचा आर्शिवाद आहे, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने स्ट्रक्चरल आॅडीट करुन घेण्यास उशीर झाला आहे. मात्र आता जे स्ट्रक् चरल आॅडीट करणार नाहीत, त्यांच्याविरोधात नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
(दिनेश तायडे - उपायुक्त, जाहीरात विभाग, ठामपा)