शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

देशाचे ऐक्य आणि अखंडता यासाठी सशक्त सेना नेहमीच तत्पर : विलास सुतावणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 5:22 PM

विलास सुतावणे यांनी भारतीय सैन्यदलाबद्दलचे आपले अनुभव कथन केले.

ठळक मुद्दे देशाचे ऐक्य आणि अखंडता यासाठी सशक्त सेना नेहमीच तत्पर : विलास सुतावणेअत्रे कट्ट्यावर ‘जरा याद करो कुर्बानी आणि परमवीरचक्र’ या कार्यक्रमाचे आयोजनराष्ट्रप्रेमाचे नाते परमवीरचक्र या पुरस्कारासाठी जोडलेले असते : विलास सुतावणे

ठाणे : भारतीय सैन्य हे या देशातील विविधतेतील एकता या ब्रीदवाक्याचे मुर्तीमंत उदाहरण आहे. धर्म, जात, पंथ, भाषा या पलिकडे जाऊन देशाचे ऐक्य आणि अखंडता यासाठी सशक्त सेना नेहमीच तत्पर असते. त्यांच्यासाठी भारतीय हा एकच धर्म असतो अशा भावना विलास सुतावणे यांनी व्यक्त केल्या.        अत्रे कट्ट्यावर ‘जरा याद करो कुर्बानी आणि परमवीरचक्र’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुतावणे उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले, आपल्या सैन्यदलातील प्रत्येक जण स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता देशावर आलेल्या परकीय आक्रमणाला धीराला सामोरे जात असतो. माणसाच्या काही भावना नैसर्गीक असतात. जसे की, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राष्ट्रप्रेम हे उपजत असते. यातील राष्ट्रप्रेमाचे नाते परमवीरचक्र या पुरस्कारासाठी जोडलेले असते असे मत त्यांनी मांडले. २४ आॅक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली. भारत हा संस्थापक सदस्य होता. जागतिक शांतता हे या संयुक्त राष्ट्रसंघाचे महत्त्वाचे उद्दीष्ट होते. भारतीय वायुदल आणि सैन्यदल यांचे श्रीलंकेतील तमिळ बंडखोर शोधायची मोहीम म्हणजे आॅपरेशन पवन आणि त्यात नेमके ८ महत रेजिमेंटचे रामस्वामी परमेश्वरन शहीद झाले आणि त्यांना मरणोपरांत परमवीरचक्र देण्यात आले. १९८७ साली सियाचीन युद्ध झाले. तेथे २१. १५३ फुट उंचीवर ४० ते ६० किमी वेगाने वारे वाहतात. तापमान ३५ ते ५५ अंश सेल्सिअस तापमान आहे आणि या भागावर ताबा ठेवण्यासाठी गेली ३० ते ३२ वर्षे भारत आणि पाकिस्तान प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. तेथील हवामान आपला एक नंबरचा शत्रू आहे. परमवीरचक्र हे युद्धातील शौर्याबद्दल देण्यात येणारे भारतातील सर्वोच्च पारितोषिक आहे. भारतरत्न पुरस्काराच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे हे मानचिन्ह आहे. १९९९ सालातील कारगील युद्ध प्रसिद्धी माध्यमांमुळे आपल्या सगळ््यांनाच स्मरणात आले. या युद्धात चार शुरवीरांना परमवीर चक्र मिळाले. मनोज कुमार पांड्ये आणि विक्रम बात्रा या दोघांना मरणोत्तर परमवीर चक्र मिळाले तर ग्रेनेडिअर योगेंद्रसिंग यादव आणि रायफल मॅन संजय कुमार यांना हा पुरस्कार जीवंत असताना मिळाला. १९६२च्या चीनबरोबर झालेल्या युद्धात भारताचा पराभव झाला. तरिसुद्धा भारतीय सैन्याने खचून न जाता असामान्य शौर्य दाखविले. मेजर धनसिंग थापा, सुभेदार योगिंदर सिंग आणि मेजर शैतानसिंग यांना परमवीरचक्राने सन्मानीत करण्यात आले. देशाला समृद्ध करण्यासाठी अहोरात्र परिश्रम आणि पराक्रम गाजविणाºया प्रत्येक सैनिकांसाठी नव्हे तर सर्व भारतीय नागरिकांसाठी असे हे २१ परमवीरचक्र विजेते नेहमीच प्रेरणादायी ठरतील. यावेळी त्यांनी गदिंमांच्या सैनिक हो तुमच्यासाठी या ओळी सादर केल्या.

टॅग्स :thaneठाणेIndian Armyभारतीय जवानIndiaभारत