ठाणे: एकीकडे शहरात नाक्या नाक्यांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात करुन पोलिसांनी दोन हजार तळीरामांवर कारवाईचा बडगा उगारला. तर दुसरीकडे पोलिसांची सुरक्षा भेदून ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या तटबंदीवरुन ७०० ग्रॅम वजनाच्या ४३ गांजाच्या पुडया तर रिकाम्या बाटल्यांमध्ये दोन हजार ३८२ नशेच्या गोळया फेकण्यात आल्याची घटना कारागृह प्रशासनाच्या तपासणीत ३० डिसेंबर रोजी उघड झाली. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. इतक्या मोठया प्रमाणात अमली पदार्थांचा साठा कारागृहात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या भिंतीवरून ७२१ ग्रॅम वजनाच्या गांजाच्या ४३ पुडया आणि एक लीटर पाण्याच्या रिकाम्या बाटलीत सुमारे दोन हजार ३८२ पांढऱ्या रंगाच्या नशेच्या गोळयांचा साठा नवीन कारागृह विभागातील बरॅक क्रमांक तीन आणि चारच्या शौचालयाच्या पाठीमागील भाागत आढळला. तुरु ंग अधिकारी अतुल तुवर यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात ३१ डिसेंबर रोजी दाखल केलेल्या तक्रारीनुसार २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते ३० डिसेंबर रोजी दुपारी १.३० वा. च्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने कारागृहाच्या बाहेरील तटबंदीवरून कारागृह विभागातील बँरक क्रमांक तीन आणि चारच्या पाठीमागील तटभिंतीजवळील शौचालयाच्या शेजारी दोन प्लास्टिकच्या पिशवीत ७४१ ग्रॅम वजनाच्या ४३ पुडयांमध्ये इतर नशेची सामुग्रीचा साठा फेकलेला आढळला. यातील गुलाबी रंगाच्या प्लास्टिक पिशवीवर सुरत येथील पत्ता असून गोळयांवर एन/टी असा मार्क आहे. या अंमलीपदार्थांची किमत लाखोच्या घरात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.------------------
धक्कादायक: ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात मिळाला अमली पदार्थांचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 22:16 IST
सर्वत्र नववर्ष स्वागताची धूम सुरु असतांनाच ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा भेदून चक्क गांजाच्या ४३ पुडया आणि पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये दोन हजार ३८२ नशेच्या गोळया प्लास्टीकच्या पिशवीतून कोणीतरी कारागृहाच्या भिंतीवरुन भिरकविल्याने एकच ख्रळबळ उडाली आहे.
धक्कादायक: ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात मिळाला अमली पदार्थांचा साठा
ठळक मुद्देभिंतीवरुन गांजाच्या ४३ पुडयारिकाम्या बाटल्यांमध्ये दोन हजार ३८२ नशेच्या गोळयाठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल