शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरमध्ये पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 07:27 IST

मीरा-भाईंदरमधील ६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुकाने सुरू ठेवणे आदी प्रकारे उल्लंघन करणाऱ्या लोकांविरोधात शुक्रवारपासून तब्बल ७९ गुन्हे दाखल केले गेले असून, नवीन गुन्हे दाखल करण्याचा सपाटा पोलिसांनी लावला आहे.

मीरा रोड - कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी शासनासह पालिकेने केलेल्या उपाययोजना व आदेशांना धुडकावणाऱ्यांविरोधात ठाणे ग्रामीण पोलीसांनी धडक गुन्हे दाखल करण्याची मोहीमच सुरू केली आहे. मीरा-भाईंदरमधील ६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुकाने सुरू ठेवणे आदी प्रकारे उल्लंघन करणाऱ्या लोकांविरोधात शुक्रवारपासून तब्बल ७९ गुन्हे दाखल केले गेले असून, नवीन गुन्हे दाखल करण्याचा सपाटा पोलिसांनी लावला आहे. त्यामुळे दुकाने-व्यवसाय सुरू ठेवणाऱ्यांसह सोशल मीडियावर खोट्या अफवा पसरवणाऱ्या अपप्रवृत्तींचे धाबे दणाणले अहेत.शासनासह मीरा-भाईंदर महापालिकेने देखील शहरातील जिवनावश्यक तसेच वैद्यकिय सेवा वगळता बाकी सर्व आस्थापना, दुकाने, व्यवसाय, फेरीवाले यांना ३१ मार्च पर्यंत बंदी घातलेली असताना देखील कोरोनाच्या आपत्तीचे गांभीर्य न राखता त्याचे उल्लंघन करुन काहींनी बार, दुकाने- व्यवसाय सुरु ठेवले. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, माहाराष्ट्र कोवीड - १९ उपाय योजना नियम तसेच भादविसच्या कलम १८८ नुसार पोलीसांनी अशा दुकाने - आस्थापनां विरुध्द गुन्हे दाखल करण्याचा धडाका लावला आहे.पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी पाटील, अपर अधीक्षक संजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शना खाली भार्इंदर उपअधीक्षक डॉ शशिकांत भोसले , मीरारोड उपअधीक्षक शांताराम वळवी सह पोलीस ठाणे प्रभारींनी गुन्हे दाखल करण्याची धडक कारवाई चालवली. मीरारोड विभागाने ४१ तर भार्इंदर विभागाने ३८ गुन्हे दाखल केले आहेत. मीरारोड मधील नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक केलास बर्वे यांनी सर्वाधिक २६ गुन्हे दाखल केले आहेत. भार्इंदरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, मीरारोडचे निरीक्षक संदिप कदम, काशिमीराचे वरिष्ठ निरीक्षक संंजय हजारे, नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश बिराजदार, उत्तन सागरी पोलीस ठाणे प्रभारी सतिश निकम आदींनी देखील गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही चालवली आहे.दाखल गुन्ह्यां मध्ये विविध दुकान चालकांसह स्रेहांजली सारख्या बड्या शोरुमचा सुध्दा समावेश आहे. शिवाय अंतपुरा बारचा चालक विश्वनाथ शेट्टी (४९) रा. भारती पार्क, मीरारोड , मनी पॅलेस बार चा चालक मंजुनाथ गौडा, स्पेंटा हॉटेलचा मुस्तफा अब्दुलवाहिद मुखी, साईदिपा बार चा प्रविण पुजारी आदींचा आरोपीं मध्ये समावेश आहे. शासन व महापालिकेने बंद करण्यास सांगीतलेल्या आस्थापना, दुकाने वा व्यवसाय सुरु ठेवणारायांवर तसेच गर्दी गोळा करणारायांवर देखील गुन्हे दाखल करत आहोत. कोरोनाचा संसर्ग ही राष्ट्रीय आपत्ती असल्याने सर्वांनी यात सहकार्य करावे. पण जे उल्लंघन करतील त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी दिला आहे.