शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांची दालनबंदी कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर; प्रशासनाने बजावली कारणे दाखवा नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 21:53 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या पदसिद्ध अधिकाऱ्यांनी २० जानेवारीपासुन सुरु केलेल्या दालन बंद आंदोलनामुळे सुमारे ४० कर्मचारी कामाविना फूल पगारी ठरले. या कर्मचाऱ्यांनी त्याची कल्पना प्रशासनाला न दिल्याने त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

- राजू काळे भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या पदसिद्ध अधिकाऱ्यांनी २० जानेवारीपासुन सुरु केलेल्या दालन बंद आंदोलनामुळे सुमारे ४० कर्मचारी कामाविना फूल पगारी ठरले. या कर्मचाऱ्यांनी त्याची कल्पना प्रशासनाला न दिल्याने त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.पालिकेत सध्या आयुक्त विरुद्ध सत्ताधारी असा कलगीतुरा रंगला आहे. पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते आम्हाला जुमानतच नसल्याची भावना सत्ताधाऱ्यांची झाल्याने त्यांनी काही महिन्यांपुर्वी आम्ही पालिकेत तसेच प्रत्येक सभेत उपस्थितच राहणार नसल्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. मात्र सत्ताधाय््राांचा हा इशारा हवेतच विरळ झाल्याने त्यांनी आयुक्तांना सत्ताधाऱ्यांच्या बाजुने कल देण्यासाठी प्रयत्न सुरु केला. मात्र आयुक्त त्याला बधले नाहीत. तसेच त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या बेकायदेशीर कारभाराला खो घालीत महापौर डिंपल मेहता यांच्या दालनातील बैठकीला उपस्थित राहणेच बंद केले. त्यामुळे संतप्त सत्ताधाय््राांनी स्थानिक नेतृत्व आ. नरेंद्र मेहता यांच्या निर्देशानुसार २० जानेवारीपासुन आयुक्तांच्या एकतर्फी कारभाराच्या निषेधार्थ दालने बंद आंदोलन सुरु केले. त्याबाबत प्रशासनाला कोणतीही पुर्वसूचना अथवा कल्पना न देता महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेता व सहा प्रभाग समिती सभापतींनी आपापली दालने परस्पर कुलूपबंद केली. यामुळे त्यातील कर्मचारीवर्ग दालनाबाहेर बिनकामाचे फूल पगारी ठरले. सत्ताधाय््राांनी प्रशासनाच्या वास्तूतील दालने बेकायदेशीर बंद करुन त्यातील कर्मचाऱ्यांना देखील कामाविना ठेवल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी प्रशासनाकडे केली. दरम्यान त्या दालनांतील कर्मचाऱ्यांना काम सुरु करण्यासाठी दालने खुली करण्याची मागणी २२ जानेवारीला विरोधकांकडुन करण्यात आल्याने प्रशासनाने महापौरांच्या दालनाखेरीज उपमहापौर, स्थायी सभापती व सभागृह नेत्याची दालने २३ जानेवारीला खुली करुन त्यातील कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले. यानंतर त्यांनी प्रशसानाला दालनबंदीच्या कालावधीत कोणतीही कल्पना न दिल्याने त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तदनंतर प्रशासनाने बुधवारी महापौरांसह प्रभाग सभपातींची दालने खुली करुन कर्मचाऱ्यांना नागरीकांच्या तक्रारी व प्राप्त पत्रव्यवहारावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. दरम्यान त्यांना पाठविण्यात आलेल्या नोटीसांमुळे बिथरलेल्या कर्मचाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना त्याची माहिती देत प्रशासनाला खुलासा सादर करण्यास सुरुवात केली आहे. यात सत्ताधाऱ्यांची दालनबंदी कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर पडल्याची चर्चा मात्र पालिका वर्तुळात सुरु झाली आहे.- महापौर दालनात सध्या १ अधिकारी, १ लिपिक, १ संगणक चालक, ४ शिपाई अशा एकुण ७ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपमहापौर, स्थायी समिती सभापती व सभागृह नेता दालनात प्रत्येकी १ लिपिक, १ संगणक चालक व ३ शिपायांची नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरीत सहा प्रभाग समिती सभापतींच्या दालनात प्रत्येकी ३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी सत्ताधाऱ्यांच्या दालन बंद आंदोलनामुळे रिकामटेकडे झाल्याने ते बिनकामाचे फूल पगारी ठरले होते.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकmira roadमीरा रोड