खंबाळपाडा रोडवर विचित्र अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:27 IST2021-06-26T04:27:23+5:302021-06-26T04:27:23+5:30

डोंबिवली : पूर्वेतील खंबाळपाडा रोडवर शुक्रवारी झालेल्या विचित्र अपघातात पत्नीचा मृत्यू, तर पती जखमी झाल्याची घटना घडली. नीलिमा खरोटे ...

Strange accident on Khambalpada Road | खंबाळपाडा रोडवर विचित्र अपघात

खंबाळपाडा रोडवर विचित्र अपघात

डोंबिवली : पूर्वेतील खंबाळपाडा रोडवर शुक्रवारी झालेल्या विचित्र अपघातात पत्नीचा मृत्यू, तर पती जखमी झाल्याची घटना घडली. नीलिमा खरोटे (वय ५२) असे मृत्युमुखी पडलेल्या पत्नीचे नाव असून, पती सुभाष खरोटे हे जखमी झाले आहेत. दोघेही दुचाकीवरून जात असताना अचानक ब्रेक दाबल्याने गाडी एका बाजूला कलंडली आणि नीलिमा खाली कोसळल्या. दरम्यान केडीएमसीच्या कचरा वाहून नेणाऱ्या आरसी गाडीच्या मागील चाकाखाली त्या आल्याने त्यांचा जागेवरच चिरडून मृत्यू झाला.

केडीएमसीच्या ‘ह’ प्रभागातील कचरा वाहून नेणारी आरसी गाडी सकाळी ११.४५ च्या सुमारास तेथून कल्याणला जात होती. त्याच वेळेला दुचाकीवरून खरोटे दांपत्य त्याच मार्गाने डोंबिवलीकडे येत होते. त्यावेळी दुचाकी पुढे चालणारी गाडी अचानक थांबल्याने सुभाष खरोटे यांनीही ब्रेक दाबला. यात दुचाकीचा तोल गेल्याने ती कलंडली. त्यात मागे बसलेल्या नीलिमा पती सुभाषसह खाली कोसळल्या. या अपघातात नीलिमा आरसी गाडीच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा चिरडून जागीच मृत्यू झाला. सकाळी ११.४५ च्या सुमारास ही घटना घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, याची नोंद मानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

-------------------

Web Title: Strange accident on Khambalpada Road