ठाण्यात मुलींना सांभाळणाऱ्या महिलेने चोरले दागिने

By Admin | Updated: May 3, 2017 03:49 IST2017-05-03T03:49:51+5:302017-05-03T03:49:51+5:30

मुलींना सांभाळण्यासाठी कामाला ठेवलेल्या महिलेने घरातील सुमारे २ लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी ठाण्यात

Stolen jewelery stolen woman in Thane | ठाण्यात मुलींना सांभाळणाऱ्या महिलेने चोरले दागिने

ठाण्यात मुलींना सांभाळणाऱ्या महिलेने चोरले दागिने

ठाणे : मुलींना सांभाळण्यासाठी कामाला ठेवलेल्या महिलेने घरातील सुमारे २ लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी ठाण्यात उघडकीस आली.
बाळकूम नाक्यावरील रुणवाल गार्डन सिटी सोसायटीत राहणाऱ्या एका कुटुंबाने त्यांच्या दोन मुलींना सांभाळण्यासाठी भिवंडीतील कोनगाव परिसरातील सुशीला मोरे हिला कामावर ठेवले होते. या घरातील बेडरूममध्ये पलंगामध्ये सोन्याचा हार, चेन, कानातील झुमके असे १ लाख ९० हजार रुपयांचे दागिने एका डब्यात ठेवले होते. हे दागिने महिलेने नकळत लंपास केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. कापूरबावडी पोलिसांनी या प्रकरणी सोमवारी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)

Web Title: Stolen jewelery stolen woman in Thane