रामदास खरे यांच्या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:45 IST2021-08-25T04:45:34+5:302021-08-25T04:45:34+5:30

ठाणे : सुप्रसिद्ध लेखक, कवी, चित्रकार रामदास खरे यांच्या ‘आता अटळ आहे’ या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय सूर्योदय काव्य पुरस्कार जाहीर ...

State level award for Ramdas Khare's poetry collection | रामदास खरे यांच्या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

रामदास खरे यांच्या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

ठाणे : सुप्रसिद्ध लेखक, कवी, चित्रकार रामदास खरे यांच्या ‘आता अटळ आहे’ या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय सूर्योदय काव्य पुरस्कार जाहीर झाला असून या तिन्ही पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी रुपये ११०१, गौरवपत्र असे आहे.

जळगाव तथा नाशिक शहरातील साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी मराठीतून प्रकाशित झालेल्या विविध साहित्यकृतींना पुरस्कार जाहीर केले. जानेवारीत नियोजित पहिल्या अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. लोकमत वृत्तपत्रात त्यांनी सातत्याने लिखाण केले. मणिकर्णिका...राणी लक्ष्मीबाई, स्मरण महाराष्ट्राचे, निमित्त भटकंतीचे, भारतीय संगीत वाद्ये, असे घडले गांधीजी... एकूण तीन भाग, आणि ग्रंथोपजीविये (ईबुक..४ भाग) ही त्यांची आगामी पुस्तके आहेत.

खरे सरांचा फोटो मेलवर

..........

वाचली

Web Title: State level award for Ramdas Khare's poetry collection