शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'राज्य सरकारला आरटीई कायद्याचा विसर; ऑनलाईन शिक्षण पद्धती बंद करण्याची मागणी' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 18:10 IST

बहुजन विद्यार्थी संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर राज्य सरकारने सुरु केलेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या विरोधात आंदोलन करीत आहे

ठळक मुद्दे बहुजन विद्यार्थी संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर राज्य सरकारने सुरु केलेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या विरोधात आंदोलन करीत आहेसरकारला आर. टी. ई. कायद्याचा विसर पडला आहे. मोफत आणि सक्तीचं शिक्षण सरकार ऑनलाईनच्या माध्यमातून देणार आहे का ? असा सवाल संघटनेने विचारला आहें.

भिवंडी - राज्य सरकारने कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरु केली आहे. परंतु, ही पद्धत अत्यंत अन्यायकारक असून राज्य सरकारला आरटीई कायद्याचा विसर पडला आहे, अशी टिका करत ऑनलाइन शिक्षण पद्धती लवकरात लवकर बंद करावी अशी मागणी बहुजन विद्यार्थी संघटना ठाणे जिल्ह्याच्या वतीने प्रांत अधिकारी भिवंडी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

बहुजन विद्यार्थी संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर राज्य सरकारने सुरु केलेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या विरोधात आंदोलन करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून संघटनेच्या ठाणे जिल्ह्याच्या वतीने भिवंडी प्रांत अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने स्वतःची यंत्रणा उभी न करता केवळ पालकांच्या मोबाईलच्या भरवश्यावर ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. महाराष्ट्रात जिल्हा परिषद,महानगरपालिका, नगरपालिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही निम्म्यापेक्षा जास्त आहे. यातील बहुतांश विद्यार्थी हे गरीब घरातील आहेत. त्यातच ग्रामीण भागात वीज वारंवार खंडित होते. इंटरनेट येण्यासाठी गावाच्या वेशीवर यावे लागते. त्यातच गरीब घरातील पालकांकडे अत्यंत साधा मोबाईल फोन असतो. असलाच कोणाकडे अँड्रॉइड फोन तोही साध्या कंपनीचा असतो, अश्या बिकट परिस्थितीत सरकार ऑनलाईन शिक्षण कोणाला देणार असा प्रश्न संघटनेने शासनाला विचारला आहे.              ऑनलाईन शिक्षण व्यवस्थेत इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा सर्वांत पुढे आहेत. मुंबई सह इतर बड्या शहरांमध्ये लाखो रुपये फी घेणाऱ्या इंग्रजी शाळा आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरु केल्याने फी घेता येईल. शाळा सुरु होईपर्यंत फी घेण्याची वाट पहावी लागली तर त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार होते. म्हणून इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांच्या दबावाला बळी पडून सरकारने ही ऑनलाईन शिक्षण व्यवस्था सुरु केली आहे. असा गंभीर आरोप संघटनेने केला आहे.          सरकारला आर. टी. ई. कायद्याचा विसर पडला आहे. मोफत आणि सक्तीचं शिक्षण सरकार ऑनलाईनच्या माध्यमातून देणार आहे का ? असा सवाल संघटनेने विचारला आहें. सदरचे निवेदन देताना बहुजन विद्यार्थी संघटनेचे राज्य महासचिव प्रदीप गायकवाड, ठाणे जिल्हा अध्यक्ष नितीन तांबे, जिल्हा उपाध्यक्ष निखिल उबाळे, जिल्हा संघटक सुशील साठे, अजिंक्य गायकवाड, भिवंडी तालुका अध्यक्ष शैलेश वाघमारे, भिवंडी शहर अध्यक्ष नितेश गायकवाड, भिवंडी शहर उपाध्यक्ष प्रकाश सपकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते 

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडीSchoolशाळाEducationशिक्षण