शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

राज्य उत्पादन शुल्कची अंबरनाथमध्ये कारवाई : गावठी दारुसह ४ लाखांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 18:41 IST

ठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अंबरनाथ, डोंबिवली आणि ठाण्याच्या भरारी पथकाने अंबरनाथ येथील वेगवेगळया अवैध दारु अड्डयांवर शनिवारी पहाटेपासून दिवसभर धाडसत्र राबविले. या धाडीत १७ हजार २०० लीटर रसायन तसेच गावठी दारुसह चार लाख ११ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक नाना पाटील, ...

ठळक मुद्देभल्या पहाटे तीन पथकांनी केली कारवाईप्रथमच रसायनासह दारुचा अवैध साठावडोलचा एक तर मानेरा गावातील तीन अड्डे उद्धवस्त

ठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अंबरनाथ, डोंबिवली आणि ठाण्याच्या भरारी पथकाने अंबरनाथ येथील वेगवेगळया अवैध दारु अड्डयांवर शनिवारी पहाटेपासून दिवसभर धाडसत्र राबविले. या धाडीत १७ हजार २०० लीटर रसायन तसेच गावठी दारुसह चार लाख ११ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक नाना पाटील, कल्याणचे उपअधीक्षक रविकिरण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीचे निरीक्षक अविनाश रणपिसे, उपनिरीक्षक श्रीकांत खरात, अंबरनाथचे उपनिरीक्षक राजेश जाधव आणि ए. बी. पाटील आदींच्या तीन वेगवेगळया पथकांनी शनिवारी पहाटे १ ते ४ वाजण्याच्या दरम्यान अंबरनाथच्या मानेरा आणि वडोल गावात हे अचानक छापा टाकला. वडोल गावात एका ठिकाणी तर मानेरा गावातील तीन अशा चार वेगवेगळया अड्डयांवर राबविलेल्या या धाडसत्रामध्ये २१ हजार ५०० रूपयांची ४३० लीटर गावठी दारु, तीन लाख ४४ हजारांचे १७ हजार २०० लीटर दारु बनविण्याचे रसायन असा चार लाख ११ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन तो नष्ट केला. मानेरा गावातील मोकळया रानात सुरु असलेल्या बेकायदेशीर दारु निर्मिती प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तीन तर वडोल गावातील धाडसत्राबाबतचा गुन्हा अंबरनाथ पोलीस ठाण्यात असे चार गुन्हे दाखल झाले असून या भट्टी चालकाचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दारु अड्डयापासून रसायनाचा साठा अर्धा किलोमीटरवरमानेरा गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दारु निर्मितीच्या अड्डयावर वारंवार धाडसत्र राबवूनही या पथकाच्या हाती फारसा ऐवज लागत नव्हता. दोन दिवसांपूर्वीही त्याठिकाणी कारवाई झाली हाती. तेंव्हाही विशेष मुुद्देमाल हाती लागला नव्हता. त्यामुळेच अत्यंत गोपनीयता राखून भल्या पहाटे भरारी पथकांसह तीन पथकांनी शनिवारी हे धाडसत्र राबविले. त्यावेळी दारु अड्डयापासून एका रबरी वाहिनीच्या आधारावर अर्धा किलोमीटर अंतरावर या पथकाला हजारो लीटर रसायनाचा साठा मिळाल्याचे एका वरीष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाMaharashtraमहाराष्ट्र