शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

रेल्वेकडून राज्याची कोंडी; मजुरांच्या विशेष गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 01:00 IST

जेमतेम चार तास अगोदर पूर्वसूचना - प्रशासनाचा दावा

- सुरेश लोखंडे ठाणे : परप्रांतीय मजुरांना गावी सोडण्याकरिता रेल्वेगाड्या उपलब्ध करून देण्यावरून महाविकास आघाडी सरकार व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना मजुरांकरिता गाडी सोडण्यात येणार असल्याची माहिती केवळ चार तास अगोदर मिळते. त्यामुळे अल्पावधीत या रेल्वेने गावी जाणाऱ्या मजुरांची जमवाजमव करताना तारांबळ उडते, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. आम्ही रेल्वेगाड्या देण्यास तयार आहोत, पण गाड्या रिकाम्या जाता कामा नये, असे रेल्वेमंत्री बजावत असले, तरी खरी मेख ही रेल्वेगाड्यांच्या ऐनवेळी दिल्या जाणाºया सूचनेत असल्याचे उघड झाले आहे. रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या प्रवृत्तीतून हे घडत असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.

कोरोनाच्या संचारबंदीत अडकलेल्या कामगार, मजुरांना त्यांच्या राज्यांत सोडण्यासाठी रेल्वेगाड्यांची सुमारे १० ते १५ दिवस प्रशासनाला प्रतीक्षा करावी लागते. गाडी सोडण्यात येणार असल्याची सूचना जेमतेम चार तास आधी दिली जाते. संबंधित रेल्वेतून जाण्याकरिता मजूर, कामगार यांनी नोंदणी केलेली असते. परंतु, इतक्या अल्पावधीत त्यांच्यापर्यंत रेल्वेगाडी सोडण्याची सूचना पोहोचवताना जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेची तारांबळ उडते.

राज्य सरकार दररोज ८० रेल्वेगाड्या सोडण्याची मागणी करीत आहे. मात्र, प्रत्यक्षात जेमतेम ४० रेल्वे सोडण्यात येत असल्याचे विधान मुख्यमंत्र्यांनी रविवारी केले. लागलीच रेल्वेमंत्र्यांनी पाच टिष्ट्वट करून मजुरांच्या याद्या द्या, लागलीच २०० रेल्वेगाड्या सोडतो, असे आव्हान दिले. याबाबत, काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, भार्इंदरमधून मजुरांकरिता रेल्वेगाडी सोडण्याची मागणी ५ मेपासून केली गेली. प्रत्यक्षात रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय २२ मे रोजी घेण्यात आला व जेमतेम चार तास अगोदर कळवण्यात आले.

जे कामगार उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड वगैरे ठिकाणी जाण्याकरिता नोंदणी करतात, पुरावे देतात, ते रेल्वे सुटण्याकरिता नावनोंदणी केल्यावर दोन-तीन दिवस येऊन चौकशी करतात. मात्र, रेल्वे लागलीच सोडण्याची मागणी मान्य झाली नाही, तर घरी जाऊन बसतात. केवळ चार तास अगोदर सूचना मिळाल्यावर हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा किंवा राजकीय कार्यकर्त्यांच्या साहाय्याने त्यांना सूचना देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, सर्वच नोंदणी केलेल्या मजूर, कामगारांपर्यंत पोहोचता येत नाही.

साहजिकच, नावनोंदणी करताना प्रवाशांची संख्या पुरेशी दिसते. मात्र, प्रत्यक्ष रेल्वे सुटताना ३० ते ४० टक्के कामगार वेळेवर पोहोचू शकत नाहीत, असे अधिकाºयांनी सांगितले. गावी जाण्यासाठी रेल्वे सुटत नाही, हे सुरुवातीच्या पाचसहा दिवसांत लक्षात आल्यावर पुढे १५ दिवसांकरिता रेल्वेगाडीची वाट पाहण्याइतका धीर या मजूर व कामगारांमध्ये नाही. रोजीरोटी बंद झालेली असल्याने मिळेल त्या वाहनाने आपले गाव गाठण्याचा ते प्रयत्न करतात. साहजिकच, प्रवाशांची संख्या कमी होण्याचे हेही कारण आहे, असे अधिकाºयांचे म्हणणे आहे.

चार तासांत हे सोपस्कार आटोपले जातात

रेल्वे सोडण्याची सूचना चार तास अगोदर मिळाल्यावर दोन हजार कामगार, मजुरांना शोधून काढण्याकरिता महसूल आणि पोलीस यंत्रणेला जीवाचे रान करावे लागते. रेल्वेस्थानक गाठलेल्या मजुरांची वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यांना कोरे फॉर्म देऊन ते भरून घ्यावे लागतात. अशिक्षित मजुरांना फॉर्म भरायला मदत करावी लागते. फॉर्म जमा करण्याकरिता ग्रुप लीडर नियुक्त करावे लागतात. फॉर्म जमा झाल्यावर पोलीस स्टेशननुसार मजुरांचा मोबाइल नंबर, आधारकार्ड नंबर, त्यांचा येथील व गावचा पत्ता हे सर्व फीड करून यादी तयार करावी लागते.

प्रवासी आणावे लागतात शोधून

या यादीतील एक हजार २०० लोकांचा ग्रुप केल्यावर या प्रवाशांच्या ग्रुप लीडरला फोन करून ते नक्की येणार आहेत की नाही, याची खात्री करावी लागते. या कामगारांना स्टेशनवर आणण्यासाठी ४० बसची व्यवस्था करावी लागते. बसमध्ये मजूर बसलेले असताना रेल्वे तिकीट तसेच प्रत्येकाला एक साबण, दोन पाण्याच्या बाटल्या, दोन बिस्किटांचे पुडे, मास्क, सॅनिटायझरची बाटली, फूड पॅकेट असे कीट दिले जाते. मग, एकेका बसमधील मजुरांना रेल्वेगाडीत बसवावे लागते.

1,200 प्रवासी पूर्ण होण्यास अगदी २० प्रवासी जरी कमी असले, तरी रेल्वे स्थानक सोडत नाही. अशावेळी २० प्रवासी शोधून आणावे लागतात, असे राज्य प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेIndian Railwayभारतीय रेल्वे