ईव्हीएम जनजागृती मोहिमेला २७ डिसेंबरपासून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 02:53 AM2018-12-25T02:53:08+5:302018-12-25T02:53:26+5:30

मतदारांच्या मनातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसंदर्भात असलेल्या शंका दूर करण्यासाठी तसेच या मशिन्स किती निर्दोष आहेत, हे पटवून देण्यासाठी २७ डिसेंबरपासून पुढील दोन महिने जिल्हाभरात जनजागृती कार्यक्रम

 Starting from 27th December to EVM Public awareness campaign | ईव्हीएम जनजागृती मोहिमेला २७ डिसेंबरपासून सुरुवात

ईव्हीएम जनजागृती मोहिमेला २७ डिसेंबरपासून सुरुवात

Next

ठाणे : मतदारांच्या मनातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसंदर्भात असलेल्या शंका दूर करण्यासाठी तसेच या मशिन्स किती निर्दोष आहेत, हे पटवून देण्यासाठी २७ डिसेंबरपासून पुढील दोन महिने जिल्हाभरात जनजागृती कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
२०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक आहे. त्यामुळेच हा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची २० डिसेंबर रोजी तपासणी झालेली आहे. त्यानुसार, पुढील टप्प्यात जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी ३७ वाहने तैनात करण्यात आली असून यासाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी जनजागृती मोहीम राबवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. २६ डिसेंबर रोजी या मशिन्स बाहेर पडणार आहेत. मतदारांमध्ये या मशीनबाबत असलेले गैरसमज दूर व्हावेत, हा या जनजागृतीचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याने कोणाला मत दिले आहे, याची स्लिप त्याला सात सेकंदांपर्यंत पाहता येणार आहे. नव्या मशीनचे हे वैशिष्ट्य आहे. या मोहिमेसाठी राजकीय पक्षांकडूनसुद्धा मदतीची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले. या जनजागृती मोहिमेचा अजेंडा तयार करण्यात आला असून ज्या भागात कार्यक्रम घेतला जाईल, त्याची माहिती आधी दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे जिल्ह्याच्या मतदारयादीत ७७ हजार ४३६ कृष्णधवल छायाचित्रे होती, त्यापैकी १४ हजार ८६० छायाचित्रे रंगीत करण्यात आली असून ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.

प्रत्येक वाहनावर जीपीएस

जनजागृती मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक वाहनावर जीपीएस यंत्रणा बसवली असून या वाहनांच्या माध्यमातून जनजागृती होते अथवा नाही, याची माहिती घेतली जाणार आहे.
प्रत्येक वाहन कुठे आहे, याची माहितीसुद्धा या जीपीएस यंत्रणेच्या माध्यमातून मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

Web Title:  Starting from 27th December to EVM Public awareness campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.