उल्हासनगरातील बाजारपेठा नियमित सुरू करा; मनसेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 17:16 IST2020-10-15T17:16:21+5:302020-10-15T17:16:26+5:30
उल्हासनगरात फर्निचर, बॅग, गाऊन, जिन्स, इले्ट्रॉनिक्स व जपानी व गजानन कपडा मार्केट प्रसिध्द आहे.

उल्हासनगरातील बाजारपेठा नियमित सुरू करा; मनसेची मागणी
उल्हासनगर : व्यापारी केंद्र असलेल्या शहरातील बाजारपेठ शासनाच्या अटीशर्ती नुसार पुर्ण वेळ नियमित सुरू करण्याची मागणीचे निवेदन मनसेने महापालिका आयुक्तांना केली. दुकाने पूर्ण वेळ सुरू करण्यास परवानगी दिली नाहीतर, आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिला.
उल्हासनगरात फर्निचर, बॅग, गाऊन, जिन्स, इले्ट्रॉनिक्स व जपानी व गजानन कपडा मार्केट प्रसिध्द आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून बाजारपेठा बंद होत्या. तर अनलॉक दरम्यान बाजारपेठा मर्यादित वेळेत खुल्या आहेत. मात्र ग्राहक येत नसल्याचा सूर व्यापाऱ्यांनी काढला आहे. व्यापारी संघटनेने यापूर्वी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन सकाळी ९ ते रात्री ९ वाजे पर्यंत दुकानें सुरू ठेवण्याला परवानगी मागितली आहे. कोरोणाच्या पार्दुभावामुळे शहरातील बाजारपेठ नियमित सुरू नसल्यामुळे जवळपास सर्वच व्यापाऱ्यानां मोठ आर्थिक नुकसान झाले असून दुकानात काम करणारे शेकडो कामगार व मजुर बेरोजगार झाले. महापालिका आयुक्तांनी याबाबत सहानुभूती पूर्वक विचार करावा. असे बंडू देशमुख यांचे म्हणणे आहे.
शासनाने हॉटेलसह इतर अस्थापना पूर्ण वेळ सुरु करण्याची परवागी दिली आहे. त्यानुसार कोरोणाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या उल्हासनगर महापालिका आयुक्तांनी शहरातील सर्व बाजारपेठा काही अटीशर्ती नुसार पूर्णवेळ सुरू करण्याची परवानगी द्यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व्यापाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपल्या पध्दतीने आंदोलन करेल असा ईशाराही मनसेच्या शिष्टमंडळाने दिला. शिष्टमंडळात शालिग्राम सोनवणे, सचिन बेंडके, मुकेश सेठपलानी, तन्मेश देशमुख, हितेश मेहरा यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.