कल्याण-डोंबिवलीत दिव्यांगांसाठी कार व्हॅक्सिनेशन सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:43 IST2021-05-06T04:43:00+5:302021-05-06T04:43:00+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील दिव्यांगांसाठी कार व्हॅक्सिनेशन सुरू करा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त ...

कल्याण-डोंबिवलीत दिव्यांगांसाठी कार व्हॅक्सिनेशन सुरू करा
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील दिव्यांगांसाठी कार व्हॅक्सिनेशन सुरू करा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
दिव्यांगांना लसीकरण केंद्रांपर्यंत जाऊन लस घेणे जिकिरीचे असते. ज्यांच्या घरी काळजी घेणारे कोणी नसते त्यांना केंद्रावर जाऊन लस घेता येत नाही. त्यांच्यासाठी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर कार व्हॅक्सिनेशन सुरू करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. डोंबिवली पूर्व भागातील चिमणी गल्ली परिसरात कार व्हॅक्सिनेशन सुरू करण्याची म्हात्रे यांची मागणी आयुक्तांनी मान्य केली आहे. मात्र, सध्या लसींचे पुरेसे डोस नसल्याने आठवडाभरात लसींचे डोस उपलब्ध होताच कार व्हॅक्सिनेशन सुरू केले जाणार आहे.
१ मे पासून राज्यातील १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केले आहे. केंद्राची त्यासाठी असलेली गाइडलाइन्स चुकीची आहे. पहिला डोस ३० टक्के व दुसरा डोस ७० टक्के नागरिकांना दिला जाईल असे सूचित केले आहे. त्यामुळे पहिल्या डोसपासून पुन्हा १८ ते ४५ वयोगटातील नागरिक वंचित राहू शकतात. त्यामुळे केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात राज्याला लसींचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली आहे.
--------------