शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

‘स्थायी समिती सभापती निवडणूक रद्द करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 06:32 IST

ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक घेण्याबाबत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे कशी सूचना करू शकतात, हा विषय नगरविकास खात्याशी संबंधित आहे. तसेच ते खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने पालकमंत्री याबाबत कसा काय निर्णय घेऊ शकतात, असा सवाल करून ठाणे महापालिकेतील काँग्रेस गटनेते विक्र ांत चव्हाण यांनी ही निवडणूक रद्द करावी

ठाणे  - ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक घेण्याबाबत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे कशी सूचना करू शकतात, हा विषय नगरविकास खात्याशी संबंधित आहे. तसेच ते खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने पालकमंत्री याबाबत कसा काय निर्णय घेऊ शकतात, असा सवाल करून ठाणे महापालिकेतील काँग्रेस गटनेते विक्र ांत चव्हाण यांनी ही निवडणूक रद्द करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यामुळे ही निवडणूक वादात सापडली आहे.ठामपाची स्थायी समिती सभापतीची निवडणूक येत्या १६ मे ला होणार आहे. त्याकरिता, ११ मे ला उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. पण, ही निवडणूक बेकायदेशीर आहे, असा आरोप गुरु वारी काँग्रेसचे गटनेते विक्र ांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला.यावेळी त्यांनी ही निवडणूक घेण्याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. त्यांच्या निर्देशानुसार ही निवडणूक होत आहे, तसे पत्र महापालिकेने दिले आहे. मुळात ही निवडणूक लावण्याचा अधिकार नगरविकास खात्याकडे असताना पालकमंत्री याबाबत कसे काय निर्देश देऊ शकतात. तर, मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खात्याचा कारभार शिवसेनेकडे सोपवला आहे का, असा सवाल करून पालघर निवडणुकीत पालकमंत्री एकीकडे भाजपाच्या विरोधात आघाडीवर असताना ठाण्यात कोणती अडचण झाली आहे की, भाजपाने त्यांच्यासमोर नांगी टाकली आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच नगरविकास खात्याचे अधिकारी मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून काम करत आहेत का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.आदेशाला केराची टोपलीकोकण आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून स्थायी समिती गैरमार्गाने मिळवण्याचा सेनेचा डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर, ठामपाच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या हातात ठेवण्यासाठी शिवसेनेचा हा प्रयत्न आहे. मुखमंत्र्यांनी या निवडणुकीला स्थगिती द्यावी.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे