शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike : खासगी वाहनांतून प्रवासी वाहतूक सुरु, एसटी संपामुळे उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 17:24 IST

ठाणे- एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाची प्रवाशांना झळ लागू नये म्हणून जिल्हा प्रशासन आणि परिवहन विभाग सज्ज झाला असून खासगी बसेस, शाळेच्या, कंपन्यांच्या बसेस तसेच इतर खासगी वाहनांतून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. संप सुरु असेपर्यंत ही परवानगी राहील. या अनुषंगाने परिवहन विभागाने पोलीस, होमगार्ड तसेच पालिकांच्या परिवहन सेवांची ...

ठाणे- एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाची प्रवाशांना झळ लागू नये म्हणून जिल्हा प्रशासन आणि परिवहन विभाग सज्ज झाला असून खासगी बसेस, शाळेच्या, कंपन्यांच्या बसेस तसेच इतर खासगी वाहनांतून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. संप सुरु असेपर्यंत ही परवानगी राहील. या अनुषंगाने परिवहन विभागाने पोलीस, होमगार्ड तसेच पालिकांच्या परिवहन सेवांची पण मदत घ्यावी असे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले आहे. आज या संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यास सांगण्यात आले. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी अनिल पवार, परिवहन अधिकारी, पोलीस तसेच पालिकांच्या परिवहन सेवांचे अधिकारी देखील उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी संप काळात सर्व संबंधित विभागांनी समन्वय ठेवावा असे सांगितले.वाहतूक अंशत: विस्कळीतठाणे जिल्ह्यात आठ बस आगार आहेत. या आठही आगारांतून दररोज १ लाख ८५ हजार प्रवासी जा ये करतात. ठाणे तसेच भिवंडी ,शहापूर येथील कर्मचाऱ्यांच्या संपाचा संमिश्र प्रतिसादामुळे सकाळी ५ ते ६ या कालावधीत वाहतूक विस्कळीत झाली होती. पण नंतर ती टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली. कल्याण, मुरबाड, वित्थ्लावादी ,वाडा येथील वाहतूक बर्याच अंशी व्यवस्थित सुरु आहे.सर्व आगारांच्या ठिकाणी खासगी बसेस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शिवाय अडचण येऊ नये म्हणून पोलीस, एस टी महामंडळ अधिकारी, परिवहन अधिकाऱ्यांची टीम प्रत्येक डेपोत नियंत्रण करण्यासाठी तैनात करण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले. यामध्ये वायुवेग पथकांचा समावेश सुद्धा असून प्रवाशांना काही अडचणी आल्यास किंवा कुणी या संपाचा फायदा घेऊन अवास्तव भाडे आकारात असल्यास ते लगेच कार्यवाही करतील.