एसटी कमिटी चार दिवस जिल्ह्यात
By Admin | Updated: November 18, 2016 12:40 IST2016-11-18T05:09:58+5:302016-11-18T12:40:18+5:30
विधिमंडळाची अनुसूचित जमाती (एसटी) कल्याण समिती गुरुवारपासून २० नोव्हेंबरपर्यंत ठाणे जिल्हा दौऱ्यावर आहे.

एसटी कमिटी चार दिवस जिल्ह्यात
ठाणे : विधिमंडळाची अनुसूचित जमाती (एसटी) कल्याण समिती गुरुवारपासून २० नोव्हेंबरपर्यंत ठाणे जिल्हा दौऱ्यावर आहे. १५ सदस्यांच्या या समितीद्वारे जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यांच्याकडील अनुसूचित जमाती प्रवर्गाशी संबंधित बाबींची तपासणी करून झाडाझडती घेणार आहे.
पहिल्या दिवशी नियोजन भवन येथे प्रथम लोकप्रतिनिधींच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्त, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पोलीस अधीक्षक, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ठाणे मनपा, मीरा-भार्इंदर मनपा यांच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर दुपारी जिल्हा परिषदेला भेट दिली.
शहापूर येथील आश्रमशाळा, वसतिगृहे व इतर यंत्रणांच्या कामांना ही समिती १९ नोव्हेंबर रोजी भेट देणार आहे. २० नोव्हेंबर रोजी ही
समिती जिल्हाधिकारी कार्यालयात चार दिवसांच्या कामांच्या आढाव्यासंदर्भात चर्चा व मार्गदर्शन करणार आहे. या समितीमध्ये रूपेश म्हात्रे, डॉ. अशोक उईके, राजू तोडसाम, नारायण कुचे, पास्कल धनागरे, प्रभुदास भिलावेकर, संजय पुराम, प्रा. चंद्रकांत सोनवणे, काशिराम पावरा, वैभव पिचड, पांडुरंग बरोरा, गोपीकिशन बाजोरिया, आनंद ठाकूर, निरंजन डावखरे, चंद्रकांत रघुवंशी आदी विधिमंडळ सदस्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)