शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

पालघरमध्ये ८२ ठिकाणी पथकाने पकडली वीजचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 01:30 IST

महावितरणची धडक मोहीम; जिल्ह्यातील वीजचोरांवर कारवाई सुरू

पालघर : महावितरणच्या पालघर विभागाने वीजचोरीविरुद्ध उभारलेल्या धडक मोहिमेत ८२ जणांकडील वीजचोरी उघडकीस आणली आहे. या पथकाने जवळपास सव्वादहा लाख रुपयांच्या ६६ हजार युनिट वीजचोरीप्रकरणी संबंधितांविरुद्ध कारवाई सुरू आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे, असे महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितले.पालघर विभाग कार्यालयांतर्गत पालघर, बोईसर ग्रामीण व एमआयडीसी, डहाणू, जव्हार, सफाळे, तलासरी, मोखाडा आणि विक्रमगड उपविभागातील ६११ वीजजोडण्यांची आतापर्र्यंत तपासणी करण्यात आली. यात ७८ ठिकाणी वीजचोरी तर ४ ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर सुरू असल्याचे आढळून आले. याशिवाय ११ ग्राहकांच्या मीटर रीडिंगची अचूक नोंद त्यांच्या वीजबिलात झाली नसल्याचे निदर्शनास आले. ६६ हजार युनिट वीजचोरी प्रकरणी संबंधित ७८ जणांविरुद्ध विद्युत कायदा-२००३ च्या कलम १३५ नुसार, तर चार जणांविरुद्ध कलम १२६ नुसार कारवाई करण्यात येत आहे. वीजचोरीसंदर्भात जवळपास १० लाख १७ हजार रुपयांची वीजबिले भरण्याची नोटीस संबंधितांना बजावण्यात येत असून या वीजबिलाचा भरणा न करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी फिर्याद देण्यात येईल, असे महावितरण विभागाकडून सांगण्यात आले.वीजचोरीला प्रतिबंध करण्यासाठी ही मोहीम नियमितपणे राबविण्यात येणार असून मोहिमेत वीज, वीजमीटर्समधील छेडछाड शोधून अचूकपणे वीजचोरी पकडण्यासाठी अ‍ॅक्यूचेक मीटरचा वापर करण्यात येत आहे.ही मोहीम नियमित सुरू राहणार असून कटू कारवाई टाळण्यासाठी अधिकृत जोडणी घेऊनच वीजवापर करावा व मोहिमेत सहभागी कर्मचाºयांना सहकार्य करावे, असे आवाहन कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.मोहिमेमध्ये सहभागी पथकमुख्य अभियंता दिनेश अग्रवाल व पालघर विभागाच्या अधीक्षक अभियंता किरण नगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रताप मचिये व डहाणू, पालघर, जव्हार, बोईसर, सफाळे, तलासरी, मोखाडा, विक्रमगड उपविभागीय कार्यालयाच्या उपकार्यकारी अभियंत्यांसह स्थानिक अभियंते, कर्मचारी या मोहिमेत सहभागी आहेत.611 वीजजोडण्यांची आतापर्र्यंत तपासणी करण्यात आली.82 जणांविरुद्ध कलम१३५ / १२६ नुसार कारवाईवीजचोरीसंदर्भात जवळपास १० लाख १७ हजार रुपयांची वीजबिले भरण्याची नोटीस.वीजचोरी पकडण्यासाठी अ‍ॅक्यूचेक मीटरचा वापर.

टॅग्स :electricityवीज