शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा विद्यापीठाचा भूखंड मेट्रोच्या घशात; ठेकेदारावर मेहरनजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 06:51 IST

बाळासाहेब ठाकरे यांचे नाव असूनही शिवसेनेचे मौन

ठाणे : मुंबई मेट्रोच्या टप्पा ४ साठी ठाणे महापालिकेने ज्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे क्रीडा विद्यापीठ साकारले जाणार आहे, ती आपल्या मालकीची सुमारे ७५३९०.०० चौ. मी. क्षेत्राची जमीन ठेकेदाराला विनामूल्य वापरासाठी दिली असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे जोपर्यंत मेट्राचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत या क्रीडा विद्यापीठाचे भवितव्य अधांतरी आहे. सत्ताधारी यावर मौन असल्याने त्यांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त होत असून यासंदर्भात आता आयुक्त संजीव जयस्वाल काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.शासन निर्णयानुसार मेट्रो ४ या प्रकल्पासाठी कायमस्वरुपी आवश्यक असलेल्या जमिनी, एमएमआरडीएकडे नाममात्र दराने भाडेतत्वावर हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु, ठाणे महापालिकेने खाजगी वापराकरीता मेट्रोच्या ठेकेदाराला ही जागा (लेबर कॅम्प, आरएमसी प्लान्ट, कास्टिंग यार्ड) कोणतेही शुल्क न आकारता ताब्यात दिली आहे. वास्तविक पाहता शासनाने ती कायमस्वरुपी मागितलेली नाही. ती जागा ठेकेदार वापरत आहे. त्यामुळे यातून पालिकेला चांगले उत्पन्न मिळू शकत होते. परंतु, कोणताही मोबदला न घेता, पालिकेने कंत्राटदाराला ही जागा देऊन स्वत:चेच नुकसान करून घेतले आहे.भाडे वसूल करण्याची मनसेची मागणीदुसरीकडे शासनाची जागा सर्वसामान्यांना काही काळासाठी वापरण्यास द्यायची झाली तर त्यांच्याकडूून महापालिका भाडे वसूल करते. फेरीवाले, गणपती उत्सव मंडळे, फटाके विक्रेते, शेतकरी यांच्याकडूनही पालिका भाडे वसूल करते.परंतु, अशा पद्धतीने पालिका एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा न्याय कशी देऊ शकते, असा सवालही आता उपस्थित झाला आहे. त्यात या ठिकाणी भविष्यात बाळासाहेब ठाकरे क्रीडा विद्यापीठ उभारण्याचा विचार असून त्यासाठी रेडीरेकनरच्या १ टक्के दराने भाडेतत्वावर भूखंड देण्याचे निविदेत नमूद आहे.असे असताना मेट्रोच्या ठेकेदाराला मोफत भूखंड कशासाठी असा सवालही आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. त्यामुळे महापालिकेने तत्काळ ठेकेदाराकडून जागेचे भाडे वसूल करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केली आहे.

टॅग्स :Metroमेट्रोBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेना