ठाणे : लोकमत युवा नेक्स्ट आणि एल.टी.ए आयोजित प्रिन्सेस आॅफ ठाणेकर सौंदर्यविषयक स्पर्धेला ठाणेकर युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ३ आॅक्टोबरपासून या स्पर्धेची फ्लोट अॅक्टिव्हिटी सुरू झाली असून आजपर्यंत फ्लोट विद्याप्रसारक मंडळ बाळकुम विद्यालय, ज्युनिअर कॉलेज उत्कर्ष मित्र मंडळ, धोबीआळी, चरई तसेच ज्ञानसाधना कॉलेज इथे गेला होता. येथील युवतींनी विविध अॅक्टिव्हिटीमध्ये आवडीने भाग घेऊन आपले नाव स्पर्धेसाठी नोंदविले आहे. या स्पर्धेबरोबरच फॅन्टसी नेल आर्ट आणि फॅन्टसी मेकअप स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासाठी मोफत प्रशिक्षण एलटीए,ठाणे येथे ३ ते ७ आॅक्टोबरपर्यंत सुरू आहे. या कार्यक्रमाला कोरम मॉल, ठाणे, हॅथवे केबल, केबल इन, जश्न, फ्युजन बीटस्, वुड क्राफ्ट यांचे सहकार्य लाभले आहे. अधिक माहितीसाठी ७७३८८७७२२४, ९८६७९६२९०१ या क्रमांकावर संपर्क साधू शकता. (प्रतिनिधी)
प्रिन्सेस आॅफ ठाणेकरला युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: October 6, 2016 03:11 IST