शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मराठी एकीकरण समितीमध्ये फूट; कार्याध्यक्ष सह चौघांना काढले! सारख्याच नाव व बोधचिन्हाचा वापर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:15 IST

मराठी एकीकरण समितीचाच्या कार्यपद्धती, नियमावली आणि कार्यकारिणीची संमती न घेता स्वतंत्ररित्या सारख्याच नावाने वेगळी संस्था सुरू केली व सारखाच वाटेल असे बोधचिन्ह वापरून समाजात संभ्रम निर्माण करण्याचे काम केल्याने शिस्तभंगाची कारवाई करत चौघांना काढून टाकले.

मराठी एकीकरण समितीचाच्या कार्यपद्धती, नियमावली आणि कार्यकारिणीची संमती न घेता स्वतंत्ररित्या सारख्याच नावाने वेगळी संस्था सुरू केली व सारखाच वाटेल असे बोधचिन्ह वापरून समाजात संभ्रम निर्माण करण्याचे काम केल्याने शिस्तभंगाची कारवाई करत चौघांना काढून टाकले असल्याची माहिती मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिली आहे.

कार्याध्यक्ष प्रदीप सामंत, रवींद्र भोसले, मारुती भट्टगिरी, सिद्धेश पाटील ह्यांनी “मराठी एकीकरण समिती – एक लोकचळवळ” या नावाने ऑक्टोबर २०२५ मध्ये स्वतंत्रपणे नोंदणी करून कार्य करण्यास सुरुवात केली असून, आमच्या संघटनेच्या नाव व बोधचिन्हाशी साम्य असलेले चिन्ह वापरत आहे. त्यांची मराठी एकीकरण समिती – महाराष्ट्र राज्य या मूळ संघटनेतून अधिकृत हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे असलेली कार्याध्यक्ष व इतर सर्व पदे तात्काळ रद्द करण्यात आलेली आहेत. याबाबतची सर्व लेखी नोटिसा पूर्वीच देण्यात आल्या आहेत. तरीही काही व्यक्ती समाज माध्यमावर मराठी एकीकरण समितीचे नाव वापरून दिशाभूल करत आहेत.

समाजातील सर्व मराठी बांधवांना विनंती आहे की अशा गैरअधिकृत माहिती बद्दल सावध रहावे. सदर व्यक्तींमार्फत होणाऱ्या कोणत्याही प्रशासकीय, आर्थिक किंवा इतर प्रकारच्या कृतींसाठी मराठी एकीकरण समिती – महाराष्ट्र राज्य अथवा अधिकृत पदाधिकारी जबाबदार राहणार नाहीत.

आमच्या समितीतील सर्व पूर्वीचे सहकारी, पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य सक्रीयपणे आमच्यासोबत आहेत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने मराठी हितासाठी, मराठी शाळा, उद्योग, रोजगार, भाषा संवर्धन व मराठी समाजाच्या उन्नतीसाठी आम्ही एकजुटीने कार्य करत राहू असे देशमुख यांनी म्हटले आहे.

'जुनी संस्था केवळ चार सदस्य पैकी, तीन लोकांच्या हाती बंदिस्त आहे. आठ वर्षात एकही अधिक सभासद नोंद नाही. आठ वर्षात लेखा, लेखापरीक्षण केले नाही, सभासद यादी शासन दरबारीं नोंद नाही.  आर्थिक गैरफायदा घेत आहेत.एकाधिकारशाही सुरू आहे. जे विचारणा करतील त्यांच्या विरोधात खोट्या कथा रचून सदस्यांना बाहेर काढले जाते. सामाजिक बदनामी केली जाते. फोटो विद्रुप करून, सामाजिक माध्यमावर टाकून चिखल्फेक केली जाते.  अनेक शिलेदार चळवळीतून बाहेर पडले, काढले गेल, थंड झाले. मराठी चळवळीचे नुकसान नको म्हणून मी गप्प आहे', - प्रदीप सामंत ( मा. कार्याध्यक्ष, मराठी एकीकरण समिती)

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi Ekikaran Samiti Split: Four Expelled Over Duplicate Organization

Web Summary : Marathi Ekikaran Samiti faces a split. Four members, including the working president, were expelled for creating a similar organization with a confusingly similar logo. The original organization warns the public about unauthorized activities.
टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर