शिक्षक आमदारकीसाठी कितीही करा खर्च

By Admin | Updated: January 25, 2017 04:30 IST2017-01-25T04:30:07+5:302017-01-25T04:30:07+5:30

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचा एकंदर पसारा पाहून असेल, पण या निवडणुकीतील उमेदवारांना निवडणूक आयोगाने खर्चाचे कोणतेही बंधन घातलेले नाही.

Spending Anyway For Teachers | शिक्षक आमदारकीसाठी कितीही करा खर्च

शिक्षक आमदारकीसाठी कितीही करा खर्च

सुरेश लोखंडे / ठाणे
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचा एकंदर पसारा पाहून असेल, पण या निवडणुकीतील उमेदवारांना निवडणूक आयोगाने खर्चाचे कोणतेही बंधन घातलेले नाही. मात्र विविध स्वरूपाच्या मर्यादा आयोगाने घालून दिल्या आहेत. सोशल मीडियाचा प्रचारासाठी वापर करायचा असेल, तर मात्र उमेदवारांना रितसर परवानगी घ्यावी लागणार आहे.
या निवडणुकीसाठी विविध पक्ष-आघाडीचे दहा उमेदवार रिंगणात आहेत. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात या मतदारसंघांचा अवाढव्य पसारा आहे. यातील सर्व उमेदवार आर्थिकदृट्या सबळ आहेत. मतदारसंघाचा आकार पाहता उमेदवारांचा सर्वाधिक भर सोशल मीडियावर असेल. उमेदवारांच्या सभा, बैठका नियमित सुरू आहेत. पण मात्र सोशल मीडियावरील प्रचारसाहित्य, लिखाण, त्यातील मुद्दयांची तपासणी करून घेण्याची सक्ती उमेदवारांना करण्यात आली आहे.
त्यासाठी पाचही जिल्ह्यात मीडिया सर्टिफिकेशन अ‍ॅन्ड मॉनिटेरिंग कमिटी (एमसीएमसी) स्थापन करण्यात आली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ती काम करेल. फेसबुकवरील अकाऊंट ओपन करण्यासाठी, व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप तयार करण्यासाठीही उमेदवाराला या कमिटीची परवानगी घ्यावी लागणार आहे. टीव्ही चॅनेल, केबल नेटवर्क खाजगी एफएम वाहिन्या, चित्रपटगृहे, सार्वजनिक ठिकाणचे आॅडिओ-व्हिज्युअल डिस्प्ले, सोशल मीडिया, एमएमएस, व्हॉईस मेसेज आदींवर करण्यात येणाऱ्या प्रचाराचे मुद्दे, जाहिराती प्रथम तपासून घेण्याची सक्ती उमेदवारांवर आहे. त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचे बंधन मात्र उमेदवारावर नाही.

Web Title: Spending Anyway For Teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.