शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव चालकाने दिलेल्या धडकेत ५ जण जखमी; कुटुंबाचा वाद इतरांच्या जीवावर बेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 21:57 IST

या घटनेत रस्त्यावरील दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. तर गाडीचा चालक देखील जखमी झाला आहे.

अंबरनाथ- अंबरनाथच्या एस थ्री पार्क हॉटेलच्या परिसरात कुटुंबाच्या वादात एका भावाने दुसऱ्या भावाच्या चार चाकी गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक झाल्यानंतर पुन्हा गाडी वळवून समोरून त्या गाडीला धडक देत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेत रस्त्यावरील दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. तर गाडीचा चालक देखील जखमी झाला आहे.

आज सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान अंबरनाथ- बदलापूर रस्त्यावर दोन भावांच्या वादात कुटुंबावरच हल्ला करण्याचा प्रकार घडला. ज्या चार चाकी गाडीमध्ये एक भाऊ आपल्या कुटुंबीयांसह बसला होता त्याच गाडीला आणि त्या गाडीच्या ड्रायव्हरला जखमी करण्याचा प्रयत्न दुसऱ्या भावाने केला. 

एवढेच नव्हे तर त्या जखमी ड्रायव्हरला फरफटत गाडीखाली नेले आणि पुन्हा गाडी वळवल्यानंतर समोरून पुन्हा एकदा जोरदार धडक दिली. त्यामुळे या चार चाकी गाडीच्या मागे उभ्या असलेल्या दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. तर या दोन भावांच्या वादात गाडीचा चालक गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ज्या गाडीला धडक देण्यात आली त्या गाडीत लहान मुलं आणि महिला देखील होत्या. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

वडिलांच्या दुसऱ्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली

बदलापूर येथे राहणारे सतीश शर्मा यांचे वडिल बिंदेश्वर शर्मा हे त्यांच्या कुटुंबातील सतीशची पत्नी, नातु तसेच कुटुंबातील इतर सदस्यांना आपल्या कुलाबा मुंबई येथील निवासस्थानी आपल्या वाहनाने घेवून जात होते. मात्र सतीश यांची पत्नी तसेच कुटूंबातील इतर सदस्यांसोबत झालेल्या वादाच्या रागातून सतीश याने आपल्या कुटुंबाच्या वाहनाचा पाठलाग करत राज्य महामार्गावरील त्यांच्या वडिलांच्या दुसऱ्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली.

तसेच रस्त्यावरील दोन पादचाऱ्यांनाही फरफडत नेले. त्यानंतर पुन्हा पुढे नेलेले वाहन मागे वळून दुसऱ्या वाहनातील आपल्याच कुटूंबाच्या वाहनाला समोरून जोरदार धडक दिली. या घटनेत दुसऱ्या वाहना मागे असलेले मोटर सायकलस्वार ओम चव्हाण व हर्ष बेलेकर यांना जोरात ठोकर बसून ते फॉर्च्युनर गाडी खाली आल्याने जखमी झाले. यानंतर रस्त्यावरील नागरीकांनी जखमींना जवळील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर या प्रकरणी रात्री उशिरा आरोपी विरोधात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघात