चलनबदलीसाठी विशेष काउंटर
By Admin | Updated: November 17, 2016 06:53 IST2016-11-17T06:53:54+5:302016-11-17T06:53:54+5:30
भारतीय डाक विभागातर्फे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या सोयीसाठी एक हजार, पाचशे रु पयांच्या जुन्या चलनी नोटा

चलनबदलीसाठी विशेष काउंटर
ठाणे : भारतीय डाक विभागातर्फे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या सोयीसाठी एक हजार, पाचशे रु पयांच्या जुन्या चलनी नोटा, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांप्रमाणे बदलण्यासाठी विशेष काउंटर सुरू करण्यात येणार आहे.
टपाल विभाग ५० रु पये भरून बचत खाते उघडून त्यामध्ये जुन्या नोटांचा भरणा करणार आहे. टपाल खात्याचे एटीएमकार्ड घेऊन त्याद्वारे टपाल विभागाच्या एटीएम सेंटरमधून पैसे काढू शकता. यासाठी ओळखपत्र, पॅनकार्ड व आधारकार्ड यांची स्वयंप्रमाणित प्रत आवश्यक आहे. हा विशेष कक्ष सुरू करण्यासंदर्भात सूचना बुधवारी टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.