शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

घाटातील अपघात रोखण्यासाठी खास ‘बिट मार्शल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 01:33 IST

ळशेज घाटामध्ये बेदरकारपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या कारचालकांवर आता आधुनिक कारमार्फत करडी नजर राहणार आहे

टोकावडे : माळशेज घाटामध्ये बेदरकारपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या कारचालकांवर आता आधुनिक कारमार्फत करडी नजर राहणार आहे. या कारमध्ये कॅमेरे आणि वेगमर्यादा दाखवणारी अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे वेगाची मर्यादा ओलांडणाºया वाहनांची ताबडतोब नोंद होऊ न कॅमेºयामार्फत त्या वाहनांचा नंबर टिपणे सहज शक्य होणार आहे. यामुळे अपघातांबरोबरच गुन्ह्यांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे.

रस्तासुरक्षेसाठी आणि वाढते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र ट्रॅफिक पोलीस यांच्यातर्फे एक पाऊल पुढे टाकले आहे. उमरोली पोलीस चौकीअंतर्गत माळशेज घाटात दररोज होणारे अपघात आणि त्यांची वेगमर्यादा नियंत्रणात आणण्यासाठी या गाडीचा विशेष फायदा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी ही कार उमरोली पोलीस चौकीला मिळाली आहे.

राष्ट्रीय महामार्ग ६१ कल्याण-नगर हायवेवरील माळशेज घाटातून दररोज हजारो वाहनांची येजा सुरू असते. तसेच ही वाहने घाट चढउतार करत असताना वेगाने जात असतात. एखाद्या वाहनाने वेगमर्यादा ओलांडली असेल, तर उमरोळी पोलिसांच्या ताफ्यात आलेल्या नवीन कारच्या कॅमेºयामध्ये त्याची नोंद होणार आहे.

त्यानंतर, कारला अडवून चालकाविरु द्ध चलन फाडून फाइन आकारण्यात येणार आहे. या पोलीस वाहनात एचडी कॅमेरे बसवले आहेत. दिवसरात्री येजा करणाºया सर्व वाहनांची माहिती नंबरसह पोलिसांकडील ‘बीट मार्शल’ या वाहनाच्या कॅमेºयामध्ये कैदहोणार आहे. तसेच, संबंधित वाहनाच्या काचेवर काळी फिल्म असेल, तर चालकावर गुन्हा दाखल होणार आहेत. ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हप्रकरणीही वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. या वाहनामुळे घाटात होणारे अपघात कमी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

अपघात कमी करण्यासाठी होणार फायदा

माळशेज घाट ४० किलोमीटरपर्यंत पसरलेला असून अपघात आणि गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या वाहनाचा फायदा होणार असल्याचे उमरोली पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक अमरसिंग सूर्यवंशी आणि पोलीस हवालदार राजेंद्र रसाळ यांनी सांगितले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीAccidentअपघातPoliceपोलिस