शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता गायकवाडांनंतर सोनावणे यांचाही मृत्यू; तिसऱ्याच रुग्णाच्या नावे उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 16:10 IST

रुग्णालय प्रशासनाने दोन्ही कुटुंबांची माफी मागितली. परंतु यातून दोनही कुटुंबांच्या भावनेशी खेळल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.

ठाणे  : कोवीड केअर सेंटरमधून 72 वर्षीय कोरोना बाधीत बेपत्ता झालेल्या गायकवाड यांना सोनावणे कुटुंबाने अग्नी दिल्यानंतर आता तो मृतदेह त्यांचा नसून गायकवाड यांचा असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या दुखा:तून सावरत असतांनाच आता सोनावणे यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोनावणे कुटुबियांच्या पाया खालची वाळूच सरकली आहे. तिकडे गायकवाड कुटुंबाला तर आपल्या वडीलांच्या अस्थी देखील अद्याप मिळालेल्या नाहीत. विशेष म्हणजे सोनावणे यांच्यावर मोरे यांच्या नावाने उपचार रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आल्याची आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. मुळात मोरे यांना सोनावणे  दाखल होण्यापूर्वीच डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे प्रशासनाच्या सावळ्या गोंधळाचा फटका ठाणे कर नागरीकांना बसत आहे.

ठाण्याच्या नव्या सुरु झालेल्या कोवीड केअर सेंटरमध्ये 29 जून रोजी सोनावणे आणि गायकवाड हे एकाच दिवशी अॅडमीट झाले होते. त्यानंतर 3 जुलै रोजी सोनावणे कुटुंबियांना फोन करुन त्यांच्या सदस्याचा मृत्यु झाल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार त्याच दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. परतु त्यानंतर गायकवाड कुटुंबियांनी त्यांच्या सदस्याचा शोध सुरु केला. दोन दिवस त्यांचा शोध सुरु होता. यावरुन ठाण्यातील वातावरण चांगलेच गरम झाले होते. ठाणो मतदाता जागरण अभियानच्या माध्यमातून कापुरबावडी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली. तर भाजपने देखील त्यांचा शोध घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाला अल्टीमेंटम दिले होते. महापौर नरेश म्हस्के यांनी देखील प्रशासनावर या संदर्भात आगपाखड केली होती. शहरात या घडामोडी सुरु असतांनाच सोनावणो यांच्या कुटुबियांना फोन करुन सांगण्यात आले की तुमचे सदस्य अॅडमीट असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ते, गायकवाड होते. त्यामुळे येऊन तुम्ही पाहू शकता असेही सांगण्यात आले. तर 7 जुलै रोजी पोलीस स्टेशनमध्ये त्यांना बोलावण्यात येऊन ओळख परेड घेण्यात आली. तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला होता. तो र्पयत गायकवाड यांच्या कुटुंबियांनाही फोन करुन त्यांच्या सदस्याचा मृत्यु झाला असून त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गायकवाड कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला.

रुग्णालय प्रशासनाने दोन्ही कुटुंबांची माफी मागितली. परंतु यातून दोनही कुटुंबांच्या भावनेशी खेळल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.दरम्यान प्रशासनाच्या या सावळ्या गोंधळातून सोनावणे कुटुंब सावरत असतांनाच रुग्णालयातून मंगळवारी रात्री उशिरा फोन करुन, त्यांच्या सदस्याचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आधी सोनावणे म्हणून ज्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ते सोनावणो नव्हतेच, यातून सावरत असतांनाच आता त्यांचे आता त्यांना सोनावणे गेल्याचा फोन आल्याने पाया खालचीच वाळू सरकली आहे. प्रशासनाच्या एका चुकीमुळे सोनावणो आणि गायकवाड कुटुबांच्या भावनेशीच खेळण्याचा हा प्रकार केला आहे. त्यामुळे यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ठाणे  मतदाता जागरण अभियानचे सदस्य उन्मेश बागवे यांनी केली आहे. या दोनही कुटुंबांना 5क् लाखांची नुकसान भरपाई मिळावी आणि जे या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.

आदल्या दिवशी एका रुग्णाला डिस्चार्ज

सोनावणे यांना 29 जून रोजी कोवीड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या आदल्या दिवशी मोरे नावाच्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर सोनावणे यांच्यावर मोरे यांच्या नावाने उपचार सुरु होते. अशी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रशासनाचा हा सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे.

प्रशासनाच्या चुकीचा आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागला आहे. आधी सांगितले जाते की तुमचे वडील गेले आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर पुन्हा फोन येतो की तुमचे सदस्य जिवंत आहेत. हा प्रशासनाचा सावळा गोंधळ आहे, त्यात आता पुन्हा आम्ही आमच्या वडीलांना गमावले आहे. त्यामुळे आता दुहेरी दु:खाचा डोंगर आमच्यावर कोसळला आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी असलेल्यांवर शासन झालेच पाहिजे.(संदीप सोनावणे - सोनावणे यांचे नातेवाईक)

दोन दिवस आम्ही आमच्या वडीलांना शोधत होतो. परंतु त्यांच्यावर चुकीच्या नावाने प्रशासनाकडून अंत्यसंस्कारही करण्यात आले. आम्हाला अजून आमच्या वडीलांच्या अस्थी देखील मिळालेल्या नाहीत. आम्ही आमच्या कुटुंबाचा आधार गमावलेला आहे. यात आता प्रशासन संबधींतावर कारवाई करेल अशी अपेक्षा आहे.(मेहुल गायकवाड - गायकवाड यांचे नातेवाईक)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे