बदलापुरात रिक्षाचालकाच्या मुलाची इस्रोत झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:05 IST2021-05-05T05:05:54+5:302021-05-05T05:05:54+5:30

बदलापूर: बदलापुरातील एका रिक्षाचालकाच्या मुलाची इस्रोत ज्युनिअर सायंटिस्ट म्हणून निवड झाली आहे. देवानंद सुरेश पाटील असे या तरुणाचे नाव ...

The son of a rickshaw puller in Badlapur | बदलापुरात रिक्षाचालकाच्या मुलाची इस्रोत झेप

बदलापुरात रिक्षाचालकाच्या मुलाची इस्रोत झेप

बदलापूर: बदलापुरातील एका रिक्षाचालकाच्या मुलाची इस्रोत ज्युनिअर सायंटिस्ट म्हणून निवड झाली आहे. देवानंद सुरेश पाटील असे या तरुणाचे नाव आहे. देवानंदच्या या यशामुळे बदलापूरच्या लौकिकात भर पडली असून त्याबद्दल त्याच्यावर व कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

देवानंद हा मेकॅनिकल इंजिनिअर असून सध्या टाटा स्टिल जमशेदपूर येथे इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी त्याची रेल्वे लोको पायलट म्हणून निवड झाली होती. परंतु, ही नोकरी त्याने नम्रपणे नाकारली. थोडं थांबा काहीतरी वेगळं करायचंय असं त्याने कुटुंबीयांना सांगितले. टाटा स्टीलमध्ये नोकरी करतानाच तो वेगवेगळ्या परीक्षा देत राहिला. त्यापैकीच एक असलेल्या इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) परीक्षेत देवानंद देशात ओबीसीमध्ये पहिला आला असून, त्याची ज्युनिअर सायंटिस्ट म्हणून निवड झाली आहे. शुक्रवारी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून महिन्याभरात त्याची नियुक्ती कोणत्या ठिकाणी होणार, हे स्पष्ट होणार असल्याचे देवानंदचे वडील सुरेश पाटील यांनी सांगितले. देवानंदची एक बहीण इंजिनियर म्हणून नोकरी करत आहे. तर दुसरी जळगाव शासकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. या तिन्ही मुलांनी दहावीपासूनच सुयश मिळवले आहे. देवानंदला दहावीला ९७.९ टक्के, मोठ्या बहिणीला ९४ टक्के गुण होते. तर धाकटी बहीण ९७.२० टक्के गुण मिळवून मुंबई बोर्डात तिसरी आली होती.

मुलाच्या यशाचा आनंद अवर्णनीय

सुरेश पाटील हे बदलापुरातील एक प्रामाणिक रिक्षाचालक असून दिवसरात्र १२-१४ तास रिक्षा चालवून त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत मुलांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या पत्नीने दररोज ७-८ तास पापड तयार करण्याचे काम करून त्यांना साथ दिली. मुलांच्या या यशाने या कष्टाचे चीज झाले असून हा आनंद अवर्णनीय असल्याच्या भावना सुरेश पाटील यांनी व्यक्त केल्या.

Web Title: The son of a rickshaw puller in Badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.