शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

भिवंडीत जावयाची सासूला मारहाण; अखेर जावयाविरुद्ध गुन्हा दाखल

By नितीन पंडित | Updated: September 11, 2023 20:15 IST

दानिश फैजान खान वय २५ वर्ष रा. गायत्री नगर असे गुन्हा दाखल झालेल्या जावयाचे नाव आहे.

नितीन पंडितभिवंडी: सासूच्या घराशेजारी राहणारा जावई दारू पिऊन मुलीला मारहाण व शिवीगाळ करत असल्याने मुलीने तिच्या मुलांसह आपल्या घरी राहण्यास यावे असे सांगणाऱ्या सासूला जावयाने रॉडने मारहाण केल्याची घटना शहरातील गायत्री नगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी सासूने दिलेल्या तक्रारीवरून जावयाविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         

दानिश फैजान खान वय २५ वर्ष रा. गायत्री नगर असे गुन्हा दाखल झालेल्या जावयाचे नाव आहे. तो दारू पिऊन पत्नी कैफिया हिस नेहमी मारहाण व शिवीगाळ करत असे.शुक्रवारी त्यांच्यात जोरदार भांडण झाल्याने हे भांडण सोडविण्यासाठी दानिशची सासूबाई खुर्शीदाबानो फकरुद्दीन अन्सारी वय ६० वर्ष. या आल्या असता त्यांनी कैफिया हिस मुलांसोबत आपल्या घरी राहायला चल असे सांगितले. या गोष्टीचा राग दानिश यास आल्याने त्याने लोखंडी रॉडने सासूबाईला मारहाण केली. या मारहाणीत सासूबाईच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून तीचे दोन बोटे फ्रॅक्चर झाले आहेत. तर दानिशचा मुलगा तारीक हा भांडण सोडविण्यासाठी मध्ये आला असता त्याला देखील लोखंडी रोडने मारल्याने तारीकच्या नाकावर दुखापत झाली आहे. या मारहाणी प्रकरणी सासू खुर्शीदाबानो यांनी जावई दानिश विरोधात शांतिनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी