ठाण्याच्या काही भागांत आज ‘वीजब्लॉक’
By Admin | Updated: May 24, 2016 02:20 IST2016-05-24T02:20:38+5:302016-05-24T02:20:38+5:30
महावितरणने देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने शहरातील काही भागांचा वीजपुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे. या कालावधीत तारांगण चेंबर्स, विम्बल्डन पार्क, सिद्धेश्वर तलाव

ठाण्याच्या काही भागांत आज ‘वीजब्लॉक’
ठाणे : महावितरणने देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने शहरातील काही भागांचा वीजपुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे. या कालावधीत तारांगण चेंबर्स, विम्बल्डन पार्क, सिद्धेश्वर तलाव, चंदनवाडी, नितीन कंपनी, प्रेस्टिज गार्डन, पाचपाखाडी, अल्मेडा रोड, नूरी दर्गा रोड, भक्ती मंदिर, वंदना सोसायटी, टेकडी बंगला, पूर्वा सोसायटी, वंदना बस डेपो, उदयनगर, लुईसवाडी, रामचंद्रनगर १, २ व ३, कोरम मॉल, देवकॉरपोरा, सत्कार हॉटेल, टीसीएस कंपनी, व्होल्टास कंपनी, ज्युपिटर हॉस्पिटल, एक्संएलओ, जे.के. केमिकल्स, सिंघानिया स्कूल, रेमण्ड शॉप, टीएमसी पंपिंग, कौशल्या हॉस्पिटल आदी परिसरांचा वीजपुरवठा सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच लोकमान्यनगर, पोलीस कॉलनी, सावरकरनगर, बस डेपो एरिया, करवालेनगर, रोड नं. २२, रोड नं. ३३, पाचपाखाडी सावरकरनगर आदी परिसरांचा वीजपुरवठा सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.