शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य राखीव बलाच्या विविध मागण्यांसाठी समाजसेविकेचे दिव्यातील घरातच उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 21:22 IST

राज्य राखीव बलाच्या जवानांची जिल्हा बदली १५ वर्षांऐवजी दहा वर्षे करावी, या मागणीसाठी राहत्या घरीच गेल्या २० दिवसांपासून दिवा येथील समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनी उपोषण सुरु केले आहे. आपल्या मागणीची शासन दरबारी दखल घेतली जात नसल्यामुळे त्यांनी उपचारासही नकार दिला. अखेर घरीच त्यांना आॅक्सिजनवर ठेवण्यात आले असल्याचे त्यांचे पती अमोल केंद्रे यांनी सांगितले.

ठळक मुद्देप्रकृती बिघडलीउपचार घेण्यास दिला नकार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राज्य राखीव बलाच्या जवानांची जिल्हा बदली १५ वर्षांऐवजी दहा वर्षे करावी, या मागणीसाठी राहत्या घरीच गेल्या २० दिवसांपासून दिवा येथील समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनी उपोषण सुरु केले आहे. शनिवारी त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने पोलिसांनी त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात दाखल केले होते. मात्र, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरु ठेवण्यात येईल, असे सांगत त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.राज्य राखीव पोलीस बलाच्या कर्मचाऱ्यांची पोलीस दलात पूर्वी २०१४ पर्यंत दहा वर्षातच बदली केली जात होती. परंतू, २०१४ नंतर ती बदली १५ वर्षे करण्यात आली. आता १५ वर्षाऐवजी ती बदली दहा वर्षे करावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून आहे. याच मागणीसाठी समाजसेविका अश्विनी यांनी घरातच उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनाची सुरु वात मार्च २०१९ पासून झाली. या आंदोलनासाठी त्यांनी मुंबई ते ठाणे शासकीय कार्यालयांबाहेर देखील आंदोलन केले होते. यादरम्यान, अश्विनी यांनी मुंडन आंदोलन देखिल केले आहे. त्या किडनीच्याही आजाराने ग्रस्त आहेत. ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. मात्र, १३ फेब्रुवारी रोजी त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. श्वास घेण्यास त्यांना त्रास झाला होता. तेंव्हा मुंब्रा पोलिसांनी त्यांच्या दिवा येथील घरी जाऊन त्यांना सायंकाळी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात दाखल केले. त्यांची तेथील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली. आपल्या मागणीची शासन दरबारी दखल घेतली जात नसल्यामुळे त्यांनी उपचारासही नकार दिला. अखेर घरीच त्यांना आॅक्सिजनवर ठेवण्यात आले असल्याचे त्यांचे पती अमोल केंद्रे यांनी सांगितले. जर माझ्या जिवाला काही झाले तर याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, २०१९ मध्ये आश्वासन देणारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे हे जबाबदार असतील, असे आंदोलनकर्त्या अश्विनी यांनी म्हटले आहे.‘‘ एसआरपीएफमध्ये आमचे कोणीही नाही. परंतू, ज्या पद्धतीने या जवानांना हालाखीचे जीवन जगावे लागते. त्यावरुन त्यांच्यासाठी आमचा हा लढा सुरु आहे. सहा - सहा महिने हे जवान गडचिरोलीसारख्या नक्षली भागात कुटूंबापासून लांब असतात. त्यामुळेच जिल्हा बदलीचा नियम पूर्वीप्रमाणेच १५ ऐवजी दहा वर्षे करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. ’’अमोल केंद्रे, सामाजिक कार्यकर्ते तथा उपोषणकर्त्या अश्विनी यांचे पती.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSocialसामाजिक