शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस राखणार सामाजिक बांधिलकी; ठाणे वाहतूक शाखेतर्फे रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 13:40 IST

Thane Traffic Police : तीन हात नाका येथील वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयात २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता हे शिबिर  होणार आहे

ठळक मुद्देउपायुक्त कार्यालयात होणा-या शिबिरात वाहतूक शाखेच्या १८ विभागांतील पोलीस कर्मचारी रक्तदान करणार आहेत. इच्छुक ठाणेकर नागरिकांनाही या शिबिरात सहभागी होता येणार आहे. 

ठाणे - रस्ते सुरक्षा मोहिमेअंतर्गत ठाणेवाहतूक पोलीसांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून यावेळी वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचा-यांसह टीएमटी, ठाणे महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेवेत कार्यरत असलेल्या वाहनचालकांचे डोळे आणि कानांची (ओडिओमेट्री) तपासणीसुद्धा केली जाणार आहे. 

तीन हात नाका येथील वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयात २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता हे शिबिर  होणार आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होईल. सह आयुक्त डॉ. सुरेश मेखला, वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. सडक सुरक्षा जीवन रक्षा या अभियानाअंतर्गत होणा-या शिबिरांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि आधार फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे. उपायुक्त कार्यालयात होणा-या शिबिरात वाहतूक शाखेच्या १८ विभागांतील पोलीस कर्मचारी रक्तदान करणार आहेत. इच्छुक ठाणेकर नागरिकांनाही या शिबिरात सहभागी होता येणार आहे. 

वाहनांची प्रचंड वर्दळ असलेल्या आणि मोठ्या प्रमाणात प्रदूषण असलेल्या रस्त्यांवर वाहतूक पोलिसांना ड्यूटी करावी लागते. त्याचे विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतात. त्यामुळे या सर्व पोलीस कर्मचा-यांची कान आणि डोळ्यांची तपासणी करण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे. त्याशिवाय ठाणे परिवहन सेवा (टीएमटी), ठाणे महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील वाहन चालकांचीसुध्दा तपासणी या शिबिरात होईल, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लागू झालेल्या लाँकडाऊनचे निर्बंध आता शिथिल झाले आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. या काळात कोरोना संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शिबिरात मास्क वाटपही केले जाणार असल्याचेही वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसthaneठाणे