शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Video : ...म्हणून मी करतोय शिवसेनेत प्रवेश; प्रदीप शर्मांनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 16:30 IST

माझ्या उतरत्या काळात मला त्यांनी खूप मदत केली.

ठळक मुद्देशर्मांनी आज सायंकाळी ६ वाजता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केलं शिवसेनेला आणि बाळासाहेबांना मी कधीच विसरणार नाही.

ठाणे -  एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी अब तक छप्पन चित्रपटातील वन अ पोलीस ऑफिसर ऑलववेज अ पोलीस ऑफिसर हा डायलॉग म्हणत पोलीस खात्याला राम राम ठोकला. शर्मांनी आज सायंकाळी ६ वाजता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केलं असून उद्धव ठाकरे जी कामगिरी देतील ती पार पाडेन असं म्हटलं आहे. तसेच माझ्या पडत्या काळात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मला खूप मदत केल्याचं सांगत बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्ही जे एन्काउंटर स्पेशालिस्ट होतो, त्या आम्हा सर्वांना बोलावून आमच्या अडीअडचणी जाणून आमच्या पाठीवर हात फिरवत पाठबळ दिलं. माझ्या उतरत्या काळात मला त्यांनी खूप मदत केली. शिवसेनेला आणि बाळासाहेबांना मी कधीच विसरणार नाही. 

तसेच नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु असून तुमच्या विरोधात ठाकूर यांचे आव्हान आहे असा प्रश्न विचारला असता त्यांनी  मी दाऊद, छोटा राजन, लष्कर ए तोयबाचे अतिरेकी, बबलू श्री वास्तव यांच्या सारख्या गॅंगस्टर आणि दहशतवाद्यांशी दोन - दोन हात केलेत.  त्यामुळे माझ्यासाठी ठाकूर मंडळी यापेक्षा मोठी नाही आहे.  मला नालासोपारा मतदार संघातून उमेदवारी दिल्यास मी ती मोहीम फत्ते पाडेन असं ठाकूर यांना थेट आव्हान देखील प्रदीप शर्मा यांनी नाव न घेता दिलं आहे. मी निलंबित असताना मला शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांनी मदत केली. माझे निलंबन केले त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी धाडसाची धिंड या मथळ्याखाली अग्रलेख लिहला होता. अजूनही माझ्याकडे तो अग्रलेख आहे. ३६ वर्ष पोलीस खात्यात काम केले. आता सोडताना खूप दुःख होत असल्याचे शर्मा यांनी सांगितले. 

टॅग्स :PoliceपोलिसShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे