शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ओरिसातून ठाण्यात गांजाची तस्करी: तिघींकडून ५० किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 22:14 IST

ओरिसातून ठाणे आणि कल्याण परिसरात रेल्वेने गांजाची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून साडे सात लाखांचा गांजा हस्तगत केला.

ठळक मुद्दे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाईकल्याण रेल्वे स्थानकाजवळ धाडसाडे सात लाखांचा ऐवज जप्त

ठाणे: ओरिसातून मुंबई- ठाण्यामध्ये गांजाची तस्करी करणा-या जुन्नु डकवा (४५), सरोजिनी स्वाईन (३१) आणि बब्बी रेड्डी (३५, रा. तिघीही ओरिसा) या तिघींना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट ५ च्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून ४९ किलो ७२८ ग्रॅमचा सुमारे सात लाख ४५ हजार ९२० रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे.ठाणे परिसरात अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी त्यांची विक्री करणा-यांचा शोध घेण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले होते. कल्याण रेल्वे स्थानकाजवळ काही महिला तस्कर मोठया प्रमाणात गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे आणि उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे मंगळवारी सकाळी कल्याणच्या दिपक हॉटेल येथे गांजा विक्रीसाठी गि-हाईकाच्या शोधात उभे असलेल्या या तिघींना अमली पदार्थ विरोधी पथकाच्या मदतीने उपनिरीक्षक बेंद्रे, आर. सी. बनसोडे, जमादार बाबू चव्हाण, प्रदीप कदम, हवालदार मनोज पवार, देविदास जाधव, दिलीप शिंदे आणि महिला नाईक कल्पना तावरे आदींच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बॅगेतून मानवी शरीरावर आणि मनावर परिणाम करणारा सात लाख ४५ हजार ९२० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात एनडीपीएस अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाraidधाड