शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्यास मुंब्य्रातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 17:58 IST

मुंब्रा येथील वाय सर्कल जवळ वाघाच्या कातडीची विक्री करण्यासाठी आलेल्या शशिकांत दंडवते याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने मंगळवारी अटक केली.

ठळक मुद्देदहा लाखांमध्ये होणार होती विक्रीठाणे गुन्हे शाखेने केली कारवाई गिºहाईकाच्या शोधात असतांना अडकला सापळयात

ठाणे: वाघाच्या कातडीची दहा लाखांमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या शशिकांत दिनकर दंडवते (४४, रा. व्हनाळी, कोल्हापूर) यास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून वाघाच्या बछडयाचे कातडे हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंब्रा येथील वाय सर्कल जवळील ‘माज’ हॉटेल जवळ एकजण बॅगेमध्ये वाघ या वन्यजीव प्राण्याचे कातडे विक्री करण्यासाठी १३ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार सुभाष मोरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे वन्यजीव विभागाचे वनपाल मनोज परदेशी यांच्या मदतीने पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, उपनिरीक्षक दत्तात्रय सरक, कैलास सोनावणे, हवालदार सुभाष मोरे, अबुतालीब शेख आणि चंद्रकांत वाळूंज आदींच्या पथकाने मुंब्रा येथील वाय सर्कलजवळ सापळा रचून शशिकांत दंडवते याला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेच्या तपासणीमध्ये वाघाच्या बछडयाचे जुने सुकवून कडक झालेले कातडे मिळाले. या कातडयाची दहा लाखांमध्ये विक्री करण्यासाठी तो ठाण्यात आला होता, अशी माहिती चौकशीमध्ये उघड झाली. हे कातडे वाघ या वन्यजीव प्राण्याचेच असल्याचे निरीक्षक वनपाल परदेशी यांनी नोंदविले आहे. त्यानंतर याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात दंडवते याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला १६ आॅगस्ट २०१९ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. या कातडयाची आकुर्डी, पुणे येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेतही तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे