शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

धूर, धुलीकण निकषांपेक्षा चौपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 3:02 AM

डम्पिंगला ६ मार्चला लागलेल्या आगीमुळे भडका उडाला. ती आटोक्यात आणण्यासाठी रात्रंदिवस कचऱ्यावर पाणी मारावे लागले.

कल्याण : आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला मार्चमध्ये लागलेल्या आगीच्या काळात हवेतील धूर व धुलीकणांचे प्रमाण हे जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिलेल्या निकषांच्या तुलनेत चौपट होते. हवेची गुणवत्ता शून्य ते ५० दरम्यान अपेक्षित असताना ती २०० च्या घरात होती. याशिवाय, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार हवेतील गुणवत्ता ३७ ते ७१ आवश्यक आहे. परंतु, ती देखील १३२ इतकी होती, असा तपशील माहिती अधिकारात उघड झाला आहे.डम्पिंगला ६ मार्चला लागलेल्या आगीमुळे भडका उडाला. ती आटोक्यात आणण्यासाठी रात्रंदिवस कचऱ्यावर पाणी मारावे लागले. ७ मार्चला ती आणखी वाढल्याने शहरात धूरच धूर पसरला होता. तो नाकतोंडात गेल्याने नागरिक हैराण झाले होते. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला पाच दिवस लागले होते. आगीच्या काळात हवेतील प्रदूषण किती होते, याचा तपशील माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मागितला होता. मंडळाच्या नऊ पानी अहवालानुसार हवेतील धूलिकण व धुराचे प्रमाण निषकांपेक्षा जास्त होते.७ मार्चला मंडळाने डम्पिंगवर जाऊन तेथील हवेची गुणवत्ता मोजली होती. आगीमुळे हवेचे प्रदूषण किती होते, असा मुद्दा घाणेकर यांनी उपस्थित केला असला, तरी कल्याण-डोंबिवली शहरांतील प्रदूषणास कचरा, वाहनातून बाहेर पडणारा धूर, औद्योगिक कारखाने, भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहनांची रहदारी या गोष्टीही जबाबदार आहेत. त्यावर प्रकाश टाकणारा एक व्हिडीओ कुणाल यादव, संतोष शिंदे आणि निखिल करंबेळकर यांनी तयार करून नागरिकांच्या माहितीसाठी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.वायुप्रदूषण रोखण्यासाठी घाणेकर यांनी काही उपाययोजना केडीएमसीला सुचवल्या आहेत. त्याला महिना उलटला असून महापालिकेने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. डोंबिवलीतील कारखान्यांतील रासायनिक सांडपाण्यामुळे होणाºया प्रदूषणावर मात करण्यासाठी एमआयडीसीने परदेशी कंपनीकडून सविस्तर अहवाल तयार केला आहे. १०० कोटींचा हा प्रकल्प असून त्याची निविदा लवकरच काढली जाणार आहे.कल्याणमधील डम्पिंगचा मुद्दाही गंभीर आहे. कचरासमस्या ही पर्यावरणाशी संबंधित असल्याने त्याची याचिका राष्ट्रीय हरित लवादाकडे न्यायप्रविष्ट आहे. डम्पिंगची आग विझवण्यासाठी महापालिकेने पाइपद्वारे खाडीतून पाणी उचलले होते. कचºयाची दुर्गंधी रोखण्यासाठी उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. मात्र, त्यावर अद्याप उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे आजही सायंकाळी कल्याण रेल्वेस्थानकापर्यंत कचºयाचा उग्र दर्प जाणवतो.मार्चमधील आगीनंतरही प्रशासनाने ठोस उपाययोजना केलेली नाही. १२ एप्रिलला डम्पिंगला पुन्हा आग लागली. तेव्हाही नागरिक धुरामुळे हैराण झाले होते. प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने पाच कोटींची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. मात्र, त्याचा आराखडा तयार केलेला नाही. तसेच नेमका हा खर्च कशावर करणार, हे देखील स्पष्ट केलेले नाही. प्रदूषणाचे मोजमाप करणारे यंत्र डोंबिवलीतील पिंपळेश्वर येथे बसवले आहे. कल्याणमध्येही ते बसवण्याची मागणी होत आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीसडम्पिंगच्या आगीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुन्हा महापालिकेस नोटीस बजावली आहे. त्यात कचºयावर शास्त्रोक्त प्रक्रिया, कचºयाचे वर्गीकरण केले जात नाही. कचºयाची दुर्गंधी तसेच आग लागू नये, यासाठी कोणत्याच उपाययोजना केलेल्या नसल्याकडे लक्ष वेधले आहे. उपाययोजना करून त्याची अंमलबजावणी न केल्यास प्रदूषण नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केली जाईल, असे त्यात म्हटले आहे.

टॅग्स :fireआग