बहुसदस्य पॅनलविरोधात छोटे पक्ष एकवटणार
By Admin | Updated: September 15, 2016 02:23 IST2016-09-15T02:23:07+5:302016-09-15T02:23:07+5:30
हुसदस्य पॅनल पद्धती ही लहान पक्ष, संघटना तसेच अपक्षांना निवडणुकीमधून हद्दपार करण्याचा डाव असून, या प्रस्तावित पद्धती विरोधात सर्व छोट्या पक्षांना

बहुसदस्य पॅनलविरोधात छोटे पक्ष एकवटणार
ठाणे : बहुसदस्य पॅनल पद्धती ही लहान पक्ष, संघटना तसेच अपक्षांना निवडणुकीमधून हद्दपार करण्याचा डाव असून, या प्रस्तावित पद्धती विरोधात सर्व छोट्या पक्षांना
एकत्र करण्याचे प्रयत्न स्वराज्य अभियानाच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहेत. एवढा मोठा प्रभाग झाल्यास छोटे पक्ष आणि अपक्षांना मतदारांपर्यंत पोचण्याचा खर्च परवडणारा नसून, तुम्ही
निवडणूक लढऊ नका असा इशाराच यानिमित्ताने देण्यात आला आहे. या विरोधात १७ सप्टेंबर रोजी एका विरोधी सभेचे आयोजन करण्यात आले असून, या सभेमध्ये पुढची दिशा ठरवण्यात येणार आहे.
आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच प्रभाग रचना जाहीर करण्यात येईल. मुंबई महापालिका वगळता इतर महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये एका प्रभागात चार नगरसेवक उभे राहणार असल्याने या बहुसदस्य पद्धतीला उघडपणे राजकीय विरोध झाला नसला तरी स्वराज्य अभियानाच्या माध्यमातून जाहीर विरोध करण्यात आला आहे. एका प्रभागात चार नगरसेवक निवडणूक लढवणार असल्याने एका प्रभागात ७० ते ८० हजार मतदारांपर्यंत उमेदवाराला संपर्क करावा लागणार आहे.
लहान पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांना हा खर्च परवडणारा नाही. दोन सदस्यांमध्येच कामाचे श्रेय घेण्यावरून टोकाचे मतभेत असताना चार नगरसेवकांमध्ये परिस्थिती आणखी बिघडणार आहे. पक्षातील ज्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवायची इच्छा आहे त्यांना देखील कार्यकर्ते म्हणूनच काम करावे लागेल हे सर्वच पक्षांसाठी मारक असल्याचे मत स्वराज्य अभियानाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)