शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टी भागाला मिळणार एका रुपयात एक लीटर शुध्द पिण्याचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 17:56 IST

झोपडपटटी भागाला आता अवघ्या एका रुपयात एक लीटर पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध होणार आहे. महापालिकेने झोपडपट्टी भागासाठी की आॅक्सची योजना पुढे आणली आहे.

ठळक मुद्देएक रुपयात मिळणार एक लीटर शुध्द पाणीझोपडपट्टी भागासाठी खास कि आॅक्सचा उतारा

ठाणे - ठाण्यातील ज्या भागात पाणी पोहचत नाही अथवा जे भाग अद्याप विकसित झालेले नाहीत, तसेच काही झोपडपट्टी भागात आता पीपीपीच्या माध्यमातून पिण्याचे शुध्द पाणी विकण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यासाठी कि आॅक्स या पध्दतीचा वापर करुन त्याठिकाणी एटीएम कार्ड प्रमाणे कार्ड दिले जाणार असून ते स्वॉइप केल्यावर जेवढे पाणी हवे आहे, तेवढे उपलब्ध होणार आहे. परंतु यामुळे टँकर लॉबीला आळा बसणार असून टँकरपेक्षा कमी दरात हे पाणी उपलब्ध होणार आहे. त्यानुसार एक लीटरमागे पालिकेला सहा पैसे मिळणार आहे. तर संबधींत संस्थेकडून हे पाणी रुपयाला एक लीटर या प्रमाणे विकले जाणार आहे.ठाणे शहर दिवसेंदिवस विस्तारत असून जिथे जागा मिळेल तिथे नागरी वस्ती निर्माण होत आहे. परिणामी पालिकेच्या वतीने पुरवण्यात येणाऱ्या  नागरी सुविधांवर देखील याचा ताण पडत असून काही परिसरात तर पाण्यासारखी मुलभूत सुविधा पुरवणे देखील पालिकेला शक्य नाही. या परिसरात पालिकेच्या पाइपलाईन टाकणे देखील अशक्य असल्याने नागरिकांना जास्त पैसे देऊन टँकरचे पाणी वापरण्याशिवाय पर्याय नाही. महासभेत देखील या प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी पालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी अशा परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी कि- आॅस्क या वितरण व्यवस्थेचा पर्याय पालिकेने शोधून काढला आहे. त्यानुसार पीपीपी तत्वावर ही प्रणाली विकसित केली जाणार असून पाच वर्षांसाठी हा प्रकल्प खाजगी संस्थेला चालविण्यासाठी दिला जाणार आहे. परंतु यासाठी जे की- आॅक्स (पाण्याच्या छोट्या टाक्या) वापरले जाणार आहेत, ते संबधींत संस्थेने उपलब्ध करायचे आहेत.

  • काय आहे कि- आॅस्क?

ज्या भागात पाणी पुरवठा करणे पालिकेला शक्य नाही अशा भागात हे कि- आॅस्क उभारण्यात येणार आहे. यामध्ये एटीएमसारखी केबिन उभारण्यात येणार असून त्यामागे पाण्याची टाकी बसवण्यात येणार आहे. जे नागरिक कि- आॅस्क चा वापर करणार आहेत त्यांना एक कार्ड दिले जाणार असून हे कार्ड स्वाइप केल्यानंतर नागरिकांना पाणी भरता येणार आहे. जेवढे पाणी भरले तेवढेच बिल आकारले जाणार असल्याने महागड्या टेंकरचा भार नागरिकांना सोसावा लागणार नाही.

त्यानुसार या संदर्भातील महापालिकेला मिळणाºया रॉयल्टीचा प्रस्ताव २० नोव्हेंबरच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार साधे शुध्द पाण्याच्या लीटरमागे पालिकेला सहा पैसे मिळणार आहेत. तर थंडगार एक लीटर पाण्यामागे ८ पैसे पालिकेला मिळणार आहे. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेWaterपाणी