शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

स्लॉटच बुक होत नाही, लसीकरण होणार तरी कधी? नागरिकांना विविध समस्यांना जावे लागतेय सामोरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 08:49 IST

ठाण्यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी आता १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरू झाले आहे. परंतु, आधीच लसींचा साठा अपुरा असल्याने प्रत्येक महापालिकेने आपल्या केंद्रांची संख्यादेखील कमी केली आहे.

अजित मांडके - ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. परंतु, ऑनलाइन बुकिंगच्या वेळा निश्चित नसल्याने लसीकरणाचे तीन तेरा वाजले आहेत. काहींनी आठवडा होऊ न गेला तरी स्लॉट मिळत नाहीत, तर काहींनी काही क्षणात स्लॉट उपलब्ध होत आहेत. काही ठिकाणी स्लॉट बुकिंगसाठी फळीच उभारण्यात आल्याने सर्वसामान्यांना बुकिंगचा स्लॉटच मिळत नाही. स्लॉट बुक करायला गेल्यावर सेंटरचा क्रमांक टाकून ते शोधण्याच्या काही सेंकदातच स्लॉट बुक होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.ठाण्यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी आता १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरू झाले आहे. परंतु, आधीच लसींचा साठा अपुरा असल्याने प्रत्येक महापालिकेने आपल्या केंद्रांची संख्यादेखील कमी केली आहे. त्यातही ऑनलाइन बुकिंग केली जात असल्याने प्रत्येकाला स्लॉटमध्ये नंबर लागेल अशी शक्यता नाही. सुरुवातीला तर स्लॉट बुकिंगच्या वेळाच निश्चित नसल्याने गोंधळ होत होता. त्यामुळे दिवसभर तो ओपन होण्याची वाट पाहत अनेक जण मोबाइलमध्ये व्यस्त असल्याचे दिसत होते. मात्र, आता अनेक ठिकाणी स्लॉट बुकिंगच्या वेळा निश्चित केल्या आहेत. परंतु, त्या वेळा मागे पुढे होतांना दिसत आहेत. कधी तर सेंटरच दाखविले जात नाही, तर कधी ज्या वेळेत बुकिंग करणे गरजेचे आहे, त्यावेळेस स्लॉटच ओपन नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत.

ठाणे, कल्याण-डोंबिवली आदी महापालिकांच्या ठिकाणी आता बुकिंगच्या वेळा निश्चित केल्या आहेत. परंतु, त्या वेळेच्या पाच मिनिटे आधी किंवा १० मिनिटे आधी जरी बुकिंगसाठी सज्ज झाले तरीदेखील ऐनवेळेस ओटीपीच येत नसल्याने अनेकांचा खोळंबा होत आहे. त्यातही बुकिंगपर्यंत पोहचले तरीदेखील अवघ्या दोनच मिनिटात स्लॉट फुल होत आहे. दोन मिनिटात ३०० जणांचे बुकिंग कसे फुल्ल होते, असा सवाल नागरिक करीत आहेत.ठाण्यात स्लॉट बुकिंगसाठी सकाळी ९ आणि सांयकाळी पाचची वेळ निश्चित केली आहे. परंतु यातही ज्यांचे नशीब असेल त्यांनाच क्रमांक यात लागत आहे. नाही तर अनेकांचा आठवडा होऊनही नंबर लागत नाही. कुठे ओटीपी मिळत नाही, तर कुठे स्लॉट दाखविला जात नाही, कुठे तो दिसत असला तरी बुकिंग टाकता क्षणी स्लॉट फुल्ल झाल्याचे दिसत आहे.ठाणे जिल्ह्यात १८ ते ४४ या वयोगटातील तब्बल ४४ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु, आतापर्यंत ३० हजार ८९२जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या मानाने किंवा उद्दिष्टाच्या मानाने अवघे एक ते दोन टक्केच लसीकरण पूर्ण झाले आहे.

सकाळी ९ आणि सायंकाळी पाच वाजता राहा तयारठाण्यात सकाळी ९ आणि सांयकाळी पाच वाजता स्लॉट बुक करावा लागत आहे. त्यामुळे बुकिंगसाठी १० मिनिटे लॉगिन करून तयार राहा, असे आवाहन केले आहे. त्यानुसार नागरिक वेळेच्या आधीच लॉगिन करून बुकिंगसाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे. आधी आरोग्य सेतू ॲपवर जाऊन मोबाइल क्रमांक टाकल्यावर तुम्हाला ओटीपी येतो, तो टाकल्यानंतर रजिस्ट्रेशन असलेल्यांची नावे सिलेक्ट करावी लागतात. त्यानंतर केंद्राचा पिन कोड टाकावा लागतो. त्यानंतर त्याठिकाणी बुकिंग उपलब्ध आहे किंवा त्याची यादी समोर येते. त्यानंतर ते कन्फर्म करावे लागते. यात १० ते २० सेकंदाचा निश्चितच कालावधी जातो. त्याच कालावधीत बुकिंग झाले, तर ठीक अन्यथा पुन्हा दुसऱ्या दिवसाची वाट पाहावी लागत आहे.

मागील एक आठवड्यापासून लसीकरणचे स्लॉट बुक करण्यासाठी सकाळ आणि सांयकाळच्या सत्रत प्रयत्न करीत आहे. परंतु, लॉगिन करायला गेल्यावर ओटीपीच येत नाही, आणि जेव्हा ओटीपी मिळत आहे, तोपर्यंत स्लॉट फुल्ल होत आहे.    - रुपेश जाधव, नागरिक

पालिकेच्या वेळात काहीसा सावळा गोंधळ दिसत आहे. स्लॉट बुकिंगची वेळ दिलेली आहे. परंतु त्यावेळेत स्लॉट बुक होत नाही, वेळा मागे पुढे होतांना दिसत आहे. त्यामुळे अद्यापही माझे स्लॉट बुकिंग होऊ शकलेले नाही.    - संजय पाटील, नागरिक

एक आठवडा झाला सकाळी आणि संध्याकाळी सध्या स्लॉट बुकिंग कशी होईल यासाठी प्रयत्न करीत आहे. परंतु, दोन मिनिटात स्लॉट बुक होत असल्याने नुसता मनस्ताप वाढला आहे.  यावर तातडीने उपाययाेजना आवश्यक आहे.    - संजना पगारे, महिला

महापालिकेच्या वतीने सकाळी ९ वाजता आणि सांयकाळी पाच वाजता बुकिंगचे स्लॉट ओपन होत आहेत, त्यानुसार ज्यांचे बुकिंग होत आहे, त्यांना दुसऱ्या दिवशी लस उपलब्ध करून दिली जात आहे.        - संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस