स्कायवॉकचे पत्रे कोसळून १ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 00:11 IST2020-02-29T00:11:26+5:302020-02-29T00:11:29+5:30
कल्याण : पश्चिमेकडील रेल्वेस्थानक परिसरातील स्कायवॉकच्या खालच्या बाजूचे पत्रे कोसळल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. हे पत्रे एका व्यक्तीच्या अंगावर ...

स्कायवॉकचे पत्रे कोसळून १ जखमी
कल्याण : पश्चिमेकडील रेल्वेस्थानक परिसरातील स्कायवॉकच्या खालच्या बाजूचे पत्रे कोसळल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. हे पत्रे एका व्यक्तीच्या अंगावर कोसळल्याने तिला किरकोळ दुखापत झाली आहे. याआधीही स्कायवॉकचे पत्रे कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. त्यावेळी स्कायवॉकखाली उभ्या असलेल्या रिक्षांचे नुकसान झाले होते. दरम्यान, या स्कायवॉकचे चार जिने वापरासाठी धोकादायक झाल्याने ते बंद करण्याचा अहवाल मुंबई आयआयटीने केडीएमसीला दिला आहे. परंतु, पत्रे कोसळल्याच्या घटनेने केवळ जिनेच नव्हे तर या स्कायवॉकच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १० वर्षांपूर्वी हा स्कायवॉक उभारण्यात आला आहे. परंतु, देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कमी कालावधीत तो धोकादायक बनला आहे.