कल्याणचा स्कायवॉक डम्पिंग ग्राउंड

By Admin | Updated: August 11, 2015 23:38 IST2015-08-11T23:38:59+5:302015-08-11T23:38:59+5:30

कल्याण रेल्वे स्थानकालगत कडोंमपा व एमएमआरडीएने करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या स्कायवॉकवर सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे त्याला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप आले

Skylight Dumping Ground of Kalyan | कल्याणचा स्कायवॉक डम्पिंग ग्राउंड

कल्याणचा स्कायवॉक डम्पिंग ग्राउंड

टिटवाळा : कल्याण रेल्वे स्थानकालगत कडोंमपा व एमएमआरडीएने करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या स्कायवॉकवर सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे त्याला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप आले असून प्रवाशांना नाक मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. या बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा नाराजीचा सूर नागरिक व रेल्वे प्रवासीवर्गातून निघत आहे.
रोज लाखो प्रवासी व नागरिकांची ये-जा कल्याण रेल्वे स्थानकातून होत असते. या प्रवाशांच्या सुविधेसाठी कडोंमपा व एमएमआरडीएने स्कायवॉकची निर्मिती केली. परंतु, त्याची सध्या अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. त्यावरून जी.के. चौकाकडे जाणाऱ्या बाजूला गेल्या कित्येक दिवसांपासून कचऱ्याचे ढिगारे पडले आहेत. यामुळे त्याला सद्य:स्थितीला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप आले आहे. यामुळे स्कायवॉकवर दुर्गंधी पसरली असल्याने प्रवाशांना व नागरिकांना या घाणीतूनच ये-जा करावी लागते आहे. या बाबीकडे ना पालिका प्रशासन ना रेल्वे प्रशासन लक्ष देत आहे. यामुळे नागरिक व प्रवासीवर्गातून याबाबतीत नाराजीचा सूर निघत आहे. (वार्ताहर)

करोडो रु पये खर्चून बांधण्यात आलेल्या स्कायवॉकवर दुर्गंधी पसरली असल्याने आम्हा प्रवाशांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. -अशोक डोंगरे, प्रवासी

Web Title: Skylight Dumping Ground of Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.