शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
3
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
4
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
5
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
6
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
7
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
8
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
9
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!
10
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
11
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
12
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
13
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
14
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
15
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
16
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
17
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
18
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
19
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
20
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश

भिवंडी-शीळ रस्त्याचे सहापदरीकरण लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 03:15 IST

भिवंडी- कल्याण- शीळ या रस्त्याच्या सहा पदरीकरणाला राज्य सरकारने मंजुरी दिल्याने त्यासाठी कंत्राटदार नेमण्यात आला आहे.

- मुरलीधर भवार ।कल्याण : भिवंडी- कल्याण- शीळ या रस्त्याच्या सहा पदरीकरणाला राज्य सरकारने मंजुरी दिल्याने त्यासाठी कंत्राटदार नेमण्यात आला आहे. काही ठिकाणी भूसंपादन शिल्लक असल्याने तो प्रश्न निकाली निघताच प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरुवात केली जाईल. जमिनीवरील रस्त्याचे सहा पदरीकरण पूर्ण झाल्यावर कोन ते शीळ असा उड्डाणरस्ता (एलिव्हेटेड कॉरिडॉर) तयार करण्यात येणार आहे.पालकमंत्री एकनाथ शिंदे या रस्त्याच्या कामाचा आढावा मंगळवारी घेतला. या बैठकीला राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. भिवंडी- कल्याण- शीळ या रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे या रस्त्याच्या सहा पदरीकरणाला सरकारने मंजुरी दिली आहे. सरकारने भूसंपादनासाठी नऊ कोटींचा निधी ठेवला आहे. रस्त्याचे सहा पदरीकरण करण्यासाठी सरकारने निविदा प्रसिद्ध करुन कंत्राटदार कंपनी नेमली आहे. काही ठिकाणी हा रस्ता रेल्वेमार्ग ओलांंडून जाणार आहे. तेथे लागणाऱ्या जास्तीच्या जागेवर लवकरच तोडगा काढून भूसंपादनाची प्रक्रिया गतीमान करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी अधिकाºयांना दिले. भूसंपादनाचा प्रश्न सुटताच रस्त्याचे काम सुरू होईल. या रस्त्यालगतची झाडे तोडावी लागणार आहेत. त्याला महापालिकेने मंजुरी दिली आहे.या जमिनीवरील रस्त्याचे सहा पदरीकरण पूर्ण झाल्यावर कोन ते शीळ असा एलिव्हेटेड कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. त्याला राज्य सरकारच्या पायाभूत सुविधा समितीने तत्वत: मान्यता दिली आहे. मात्र त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यासाठी किती पैसे लागतील, तो कसा असेल, याचे तपशील त्यात येतील. हा कॉरिडॉर कोन ते पत्रीपुलादरम्यान कल्याण खाडीवरुन नेताना त्याची रचना कशी असेल तेही त्यातून स्पष्ट होईल. सध्याचे खाडीपूल पुरेसे आहेत की स्वतंत्र खाडीपूल उभारला जाईल हे त्यातून स्पष्ट होईल.>रिंगरोडच्या दुर्गाडी-टिटवाळा मार्गाच्या कामाला सुरुवातकल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत रिंगरोडच्या कामाला दुर्गाडी परिसरातून सुरुवात झाली आहे. दुर्गाडी ते मांडा-टिटवाळा या मार्गावरच चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा टप्पा आहे आणि तो १६.२ किलोमीटरचा आहे. त्यात ५२ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. त्यासाठी भूसंपादन विभागाने नोटिसा दिल्या होत्या. त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने तत्कालीन आयुक्त पी. वेलरासू यांनी जमीन संपादनाच्या बदल्यात प्रकल्पबाधितांना टीडीआर देण्याचे आश्वासन दिल्याने महिनाभरात चांगला प्रतिसाद मिळाला. ५२ हेक्टरपैकी २९ हेक्टर जमीनमालकांनी टीडीआर घेऊन भूसंपादनाला अनुमती दिली आहे. तेथे रिंगरोडचे काम करण्यास एमएमआरडीएच्या कंत्राटदाराला अडचण येणार नाही. महापालिकेने प्रत्यक्ष रस्त्यासाठी लागणाºया जागेतील बाधितांसाठी टीडीआर देण्याचे जाहीर केले असले, तरी रस्ते प्रकल्पात रस्त्याच्या बाजूला असलेली घरेही बाधित होणार आहेत. पण त्यांच्या मोबदल्याचे, पुनर्वसनाचे धोरण महापालिकेने जाहीर केलेले नाही. एमएमआरडीएने ८०० कोटींच्या रिंगरोड प्रकल्पबाधितांच्या नुकसानभरपाईची तरतूद केलेली नाही.प्रकल्प भूसंपादनासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १५ कोटींची तरतूद असली, तरी भरपाई पैशाच्या स्वरुपात दिला नाही. अर्थात पैसे मिळत नसल्याने भूसंपादनाची प्रक्रिया संथ असल्याची टीकाही केली जाते. भूसंपादन विभागात केवळ दोन जण नेमले आहेत. ठोकपगारी व्यक्ती तेथे अत्यल्प मानधनावर काम करीत आहेत. तेथे स्टाफ कमी असल्याने भूसंपादनाला गती येत नसल्याचे अधिकारी सांगतात.

टॅग्स :kalyanकल्याण