शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

विधानसभेसाठी जिल्ह्यात सहा हजार ४८८ मतदानकेंद्रे, जिल्हा प्रशासन सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 00:26 IST

विधानसभा निवडणुकीची तारीख कोणत्याही क्षणी घोषित होण्याची शक्यता आहे.

ठाणे : विधानसभा निवडणुकीची तारीख कोणत्याही क्षणी घोषित होण्याची शक्यता आहे. यास अनुसरून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन कामकाजाची माहिती दिली. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त अरोरा व अशोक लवासा १७ सप्टेंबरपासून राज्याच्या दोनदिवसीय दौऱ्यावर आहेत. मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात निवडणुकीच्या कामकाजाचा ते वन टू वन आढावा घेणार असल्याचे त्यांनी समिती सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.जिल्ह्यातील १८ विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून त्यासाठी ५० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नियोजनही केले आहे. याशिवाय, पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांच्यादेखील निवडणूक आयुक्तांसह सुरक्षेच्या दृष्टीने दोन बैठका पार पडल्याचेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले. या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सहा हजार ४८८ मतदानकेंद्रे निश्चित केली आहेत. त्यावर ६३ लाख २९ हजार ३८५ मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये ३४ लाख ४७ हजार १४८ पुरुषांसह २८ लाख ८२ हजार ४८८ महिला आणि ४६१ तृतीयपंथीयांना या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क दिलेला असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. यामध्ये ५५ लाख ६२ हजार ९६५ मतदारांकडे छायाचित्र ओळखपत्र आहे. तर, ५४ लाख ८५ हजार ९३५ मतदारांचे मतदारयादीत छायाचित्र असल्याचे जिल्हाधिकाºयांनी यावेळी सांगितले.>एक लाख पाचहजार ६१० मतदार वाढलेलोकसभा निवडणुकीपेक्षा एक लाख पाच हजार ६१० मतदार या आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी वाढले आहेत. मतदारयादीतून सहा हजार ४४४ मतदार वगळण्यात आलेले आहेत. यामध्ये तीन हजार ८६६ पुरुषांसह दोन हजार ५७८ महिला मतदार वगळल्याचे त्यांनी सांगितले. मतदानाचा हक्क दिलेल्या ६३ लाख २९ हजार ३८५ मध्ये प्रथमच मतदान करणाºया ८१ हजार २५६ तरुण मतदारांचा समावेश असल्याचेही जिल्हाधिकाºयांनी निदर्शनात आणून दिले.>११५९२ बॅलेट युनिटची गरजया मतदानासाठी ११ हजार ५९२ बॅलेट युनिट लागणार आहेत. मात्र, त्यापेक्षा अधिक म्हणजे १२ हजार २३४ बॅलेट युनिट उपलब्ध आहेत. कंट्रोल युनिट आठ हजार २८० लागणार आहेत.पण, आठ हजार ७३४ कंट्रोल युनिट तैनात केले आहे. याशिवाय आवश्यकतेपेक्षा अधिक म्हणजे नऊ हजार ३८८ व्हीव्हीपॅट मशीन मतदानासाठी सज्ज असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.>दीड हजार मतदारांसाठीएक मतदानकेंद्रया निवडणुकांसाठी शहरी व ग्रामीण भागात एक हजार ५०० मतदारांसाठी एक मतदानकेंद्राचा निकष लावण्यात आलेला आहे. त्यानुसार, सहा हजार ६२१ मतदानकेंदे्र निश्चित केले आहेत. यामध्ये सहा हजार ४८८ मूळ मतदानकेंद्रे असून साहाय्यकारी १३३ मतदानकेंद्रांचा समावेश आहे. यामधील पाच हजार ५०८ मतदानकेंदे्र तळ मजल्यावर आहेत. तर, मंडपात ८३२ मतदानकेंद्रे निश्चित केली आहेत. लिफ्टची सुविधा असलेल्या पहिल्या मजल्यावर १९९ मतदानकेंद्रे आहेत. दुसºया मजल्यावर ५० आणि तिसºया मजल्यावर दोन मतदानकेंद्रे जिल्हा प्रशासनाने या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी निश्चित केले आहे.>निवडणूक साहित्यतुर्भे येथे ठेवणारया निवडणुकीसाठी तुर्भे येथील केंद्र शासनाने गोडाउनमध्ये ईव्हीएम मशीन व निवडणुकीचे साहित्य ठेवले जाणार आहे. कोपरी येथील गोडाउनमधील सर्व साहित्य तुर्भे येथील गोडाउनमध्ये हलवण्यात येणार आहे. तुर्भे येथील गोडाउन मोठे असल्यामुळे कंटेनर व इतर वाहने उभी करण्यासह वळवण्यासाठी मैदान आहे. या गोडाउनमधूनच जिल्ह्यातील १८ विधानसभेच्या मतदानकेंद्रांवर साहित्य पाठवण्याचे नियोजन केले आहे. याशिवाय, १८ स्ट्राँग रूम व १८ मतमोजणीकेंद्रांच्या ठिकाणांचीदेखील पाहणी करून ते निश्चित केल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.>1950टोल फ्री क्रमांकासह पूरग्रस्तांसाठी सोयमतदारांना त्यांचे नाव मतदारयादीत आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी मतदारांना १९५० या टोल फ्री क्रमांकावर फोन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एवढेच नव्हे तर घरात पाणी शिरल्यामुळे मतदानकार्ड हरवले असेल, वाहून गेलेले असल्यास त्याविषयीची माहितीदेखील या क्रमांकावर कळवण्याचे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019