तलवारीने खूनाचा प्रयत्न करणाऱ्या गुंडासह सहा जणांना सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 08:39 PM2020-12-05T20:39:54+5:302020-12-05T20:42:26+5:30

पैशाच्या वादातून तलवारीने वार करुन खूनाचा प्रयत्न करणाºया शिवा ठाकूर याच्यासह सहा आरोपींना ठाणे न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावास आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सहा वर्षांपूर्वी नोपाडयातील मल्हार सिनेमाच्या गेटजवळ हा प्रकार घडला होता.

Six people, including a goon who attempted murder with a sword, were sentenced to seven years rigorous imprisonment | तलवारीने खूनाचा प्रयत्न करणाऱ्या गुंडासह सहा जणांना सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

ठाणे न्यायालयाचा निर्णय

Next
ठळक मुद्दे ठाणे न्यायालयाचा निर्णयसात हजारांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: नवरात्रोत्सव आणि गणेशोत्सवात जमा झालेल्या वर्गणीच्या वादातून गुंड शिवा ठाकूर याच्यासह त्याच्या अन्य पाच साथीदारांनी सुनिल कोंडभर (३३, रा. नौपाडा, ठाणे) यांच्यावर तलवारीने वार करुन खूनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी शिवा याच्यासह सहा जणांना ठाण्याचे अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी सात वर्षे सश्रम कारावास आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
ठाण्याच्या मल्हार सिनेमागृहाच्या गेटजवळ ८ जून २०१४ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास हे थरारनाटय घडले होते. शिवा आणि ज्यांच्या खूनाचा प्रयत्न झाला होता ते सुनिल कोंडभर हे नौपाडयातील दमाणी इस्टेट या एकाच परिसरात वास्तव्याला होते. कोंडभर हे हिंदू गर्जना मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यावेळी हिंदू गर्जना मंडळाच्या सभासदांमध्ये नवरात्रोत्सव आणि गणपती उत्सवामध्ये जमा झालेल्या वर्गणीवरुन वाद निर्माण झाला होता. शिवाजी उर्फ शिवा कल्याण ठाकूर (३५, रा. ठाणे) तसेच त्याचे साथीदार भारद्वाज उर्फ बाळा लोंढे (३५, रा. गवाणपाडा, मुलूंड), प्रसन्न उर्फ बबलू हुमणे (२९, रा. प्रशांतनगर, डोंबिवली, ठाणे), प्रशांत खोपडे (२३, रा.पाचपाखाडी, ठाणे), गणेश पवार उर्फ गण्या (२४, रा. वर्तकनगर, ठाणे), आणि सागर जाधव (२३, रा. कशेळी, भिवंडी) यांनी गर्दी जमा करुन या भांडणाचा राग मनात धरुन शिवा आणि गणेश पवार यांनी तलवारीने सुनिल यांच्या कमरेवर, डाव्या हाताच्या मनगटावर, खांद्यावर वार करुन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या मदतीला कोणीही पुढे येऊ नये म्हणून इतरांनी तलवार हातात घेऊन दहशत निर्माण करीत शिवीगाळ आणि दमदाटी केली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न करणे, दंगल माजविणे आणि आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला होता. यात भारद्वाज याला २७ आॅक्टोंबर रोजी तत्कालीन पोलीस निरीक्षक मनजितसिंग बग्गा आणि पोलीस हवालदार भास्कर वीरकर यांच्या पथकाने अटक केली होती. त्यापाठोपाठ यातील सर्व आरोपींना अटक करुन तलवारही जप्त केली होती. या सर्व आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र पाठविल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले, पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर आणि हवालदार राजू निकुंभे यांनी न्यायालयात सबळ साक्षी पुरावे सादर केले. त्याआधारे सरकारी वकील संजय लोंढे यांनी न्यायालयात फिर्यादी कोंडभर आणि पोलिसांची भक्कमपणे बाजू मांडली. त्याआधारे न्यायालयाने ४ डिसेंबर रोजी शिवासह सर्व आरोपींना सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

Web Title: Six people, including a goon who attempted murder with a sword, were sentenced to seven years rigorous imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.