दोघा व्यावसायिकांचे अपहरण करणाऱ्या ६ जणांना अटक
By Admin | Updated: April 26, 2017 21:58 IST2017-04-26T21:58:08+5:302017-04-26T21:58:08+5:30
व्याजाने दिलेल्या १२ लाख रुपयांच्या वसुलीसाठी पनवेलच्या दोघा रहिवाशांचे अपहरण केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने

दोघा व्यावसायिकांचे अपहरण करणाऱ्या ६ जणांना अटक
ऑनलाइन लोकमत
मीरारोड, दि. 26 - व्याजाने दिलेल्या १२ लाख रुपयांच्या वसुलीसाठी पनवेलच्या दोघा रहिवाशांचे अपहरण केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने भार्इंदर मधुन ६ जणांना अटक केली आहे.
पनवेलच्या खांदा कॉलनी येथे राहणारे दिनेश रंधेरीया यांनी व्यवसायासाठी संदिप श्रीकांत पारकर (३१) रा. सावरकर नगर, ठाणे याच्या कडुन १२ लाख रुपये व्याजाने घेतले होते. संदिप पैशांचे मागणी करत असता दिनेशने त्याला टोलवाटोलवी चालवली होती.
पैसे वसुलीसाठी संदिप व त्याच्या साथीदारांनी दिनेशचे खांदा कॉलनी येथुन अपहरण केले. व दिनेश हवा असेल तर ५ लाख रुपये घेऊन भार्इंदरला पाठवण्यास त्याच्या पत्नीला सांगीतले. दिनेशच्या पत्नीने सदर बाब मालेवाडी येणे राहणारे अॅल्डिसन पोय्याकारण यांना सांगीतल्यावर ते मित्रासह दिशेनचा शोध घेत भार्इंदरला आले. दरम्यान दिनेशच्या अपहरणाची बाब पोलिसांच्या निदर्शनास आणुन दिल्यावर ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सक्रिय झाले.
दरम्यान भार्इंदरच्या मॅक्सस चौकी जवळ पोय्याकरण आले असता त्यांना सुध्दा संदिप व त्याच्या साथीदारांनी बळजबरी गाडीत घातले. त्याचवेळी गुन्हे शाखेच्या पथकाने दिनेश व पोय्याकरणची सुटका करत संदिप सह शंकर तात्याबा शेलार (२८) व सुशील भागोजी मोरे (२८) दोघेही रा. गौरीशंकरवाडी, घाटकोपर; रॉजर निस्टर दिनीस (३०) रा. पालीगाव , भार्इंदर ; विशाल विश्वास मोरे (२७) रा. सावरकर नगर, ठाणे व सचीन यशवंत पोकरे (३७) रा. मानेचाळ, लोअर परळ या सहाही आरोपींना ताब्यात घेतले. सदर आरोपींसह सह त्यांचे वाहन, मोबाईल आदी भार्इंदर पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले.
पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रणजीत चव्हाण तपास करत असुन अटक आरोपींना २८ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. ( प्रतिनिधी )