मीरा-भाईंदरमध्ये सहा रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:41 IST2021-04-01T04:41:43+5:302021-04-01T04:41:43+5:30

मीरा रोड : मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाचा कहर वाढत असून मंगळवार व बुधवार या दोन दिवसांत सहा जणांचा कोरोनामुळे ...

Six patients die in Mira Bhayandar | मीरा-भाईंदरमध्ये सहा रुग्णांचा मृत्यू

मीरा-भाईंदरमध्ये सहा रुग्णांचा मृत्यू

मीरा रोड : मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाचा कहर वाढत असून मंगळवार व बुधवार या दोन दिवसांत सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना बळींची संख्या ८२५ वर पोहोचली आहे.

मंगळवारी चार तर बुधवारी दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. चालू वर्षातील मंगळवारच्या एका दिवसात चार इतक्या मोठ्या संख्येने मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. बुधवारी शहरात २३३ नवे रुग्ण सापडले. भाईंदरमध्ये ८७ तर मीरा रोडमध्ये १४६ नवे रुग्ण सापडले.

शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या २ हजार १९८ इतकी झाली आहे. आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांची संख्या २७ हजार ६११ वर पोहोचली आहे. शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच कोरोना बळींची संख्याही वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे.

Web Title: Six patients die in Mira Bhayandar