सहा महिन्यांच्या ‘पॉज’नंतर ‘गच्चीवरच्या गप्पा’ रंगणार!

By Admin | Updated: July 11, 2016 02:06 IST2016-07-11T02:06:22+5:302016-07-11T02:06:22+5:30

गेले सहा महिने खंडित झालेल्या ‘गच्चीवरच्या गप्पा’ पुन्हा रंगणार आहेत. सलग १३ महिने सुरू असलेला हा उपक्रम सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर नव्या जोमाने, दर्जेदार वक्त्यांच्या उपस्थितीत सुरू

Six-month 'Pause' will play 'chat on the terrace'! | सहा महिन्यांच्या ‘पॉज’नंतर ‘गच्चीवरच्या गप्पा’ रंगणार!

सहा महिन्यांच्या ‘पॉज’नंतर ‘गच्चीवरच्या गप्पा’ रंगणार!


ठाणे : गेले सहा महिने खंडित झालेल्या ‘गच्चीवरच्या गप्पा’ पुन्हा रंगणार आहेत. सलग १३ महिने सुरू असलेला हा उपक्रम सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर नव्या जोमाने, दर्जेदार वक्त्यांच्या उपस्थितीत सुरू होत आहे. २५ आॅगस्टपासून ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या टाउन हॉलमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे.
व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटर यामुळे कट्ट्याकट्ट्यांवर मारल्या जाणाऱ्या गप्पा लुप्त होत चालल्या असून प्रत्यक्षात भेटणे दुर्मीळ होत चालले आहे. या गप्पांना नवसंजीवनी मिळावी आणि सोशल मीडियाशिवाय किमान दोन तास एकत्र राहून गप्पांच्या दुनियेत रंगावे, यासाठी ठाण्यातील प्रसिद्ध चित्रकार सदाशिव कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ‘गच्चीवरच्या गप्पा’ हा आगळावेगळा उपक्रम १३ महिन्यांपूर्वी सुरू झाला होता.
या उपक्रमाच्या माध्यमातून न भेटणारी मंडळी एकत्र येऊ लागली. पहिला कार्यक्रम कुलकर्णी यांच्या गच्चीवर १० ते १२ मंडळींच्या उपस्थितीत पार पडला. आता तब्बल ३०० हून अधिक मंडळी या उपक्रमाशी जोडली गेली आहे. २५ आॅगस्टपासून हा उपक्रम पुन्हा सुरू होत आहे. दरमहिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी सायं. ५.३० ते ८ या वेळेत गप्पा रंगणार असून अशोक पत्की, अलका कुबल यासारखे अनेक दिग्गज वक्ते उपस्थित राहणार आहेत.
सलग १३ महिने चाललेल्या या उपक्रमात सुरुवातीला ‘कोणीही कोणत्याही विषयावर बोला’ असे स्वरूप होते. त्यानंतर, वैविध्यपूर्ण आयुष्याचा आढावा घेता यावा आणि प्रेक्षकांना दर्जेदार बौद्धिक मेजवानी मिळावी, यासाठी मान्यवर मंडळींना आमंत्रित केले जाऊ लागले.
या उपक्रमात ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सकपाळ, अभिनेते गिरीश ओक, चित्रकार सुहास बहुलकर, चित्रकार शिरीष मिठबावकर,
कवी, चित्रकार आशुतोष आपटे, आकृती सॉफ्टवेअरचे जनक श्रीधर श्रीनिवास यासारख्या अनेकांंनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: Six-month 'Pause' will play 'chat on the terrace'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.