शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत सहा महिन्यांच्या पोटच्या गोळ्यास नाल्यात बुडवून मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 06:16 IST

जन्मापासून आजारी असलेल्या सहा महिन्यांच्या मुलाच्या सततच्या रडण्यास कंटाळून जन्मदात्या आईनेच त्याला नाल्यातील पाण्यात बुडवून मारल्याची घटना शनिवारी भिवंडी तालुक्यात उघडकीस आली.

भिवंडी - जन्मापासून आजारी असलेल्या सहा महिन्यांच्या मुलाच्या सततच्या रडण्यास कंटाळून जन्मदात्या आईनेच त्याला नाल्यातील पाण्यात बुडवून मारल्याची घटना शनिवारी भिवंडी तालुक्यात उघडकीस आली. पोलिसांनी याप्रकरणी मुलाच्या आईस अटक केली आहे.कल्पना निलेश गायकर (२५) असे मुलास मारणाऱ्या निर्दयी आईचे नाव असून ती भिवंडी तालुक्यातील कवाड ग्रामपंचायत हद्दीतील धापशीपाडा, कोलिवली या गावात पती आणि आपल्या दोन मुलांसह वास्तव्यास आहे. तिचा रिषभ नावाचा सहा महिन्यांचा मुलगा जन्मापासूनच आजारी असून तो सतत रडत असल्याने त्याचे पालनपोषण करण्यास ती कंटाळली होती. त्यामुळे गेल्या आठवड्यात विश्वभारती फाट्यापासून एक किलोमीटर अंतरावरील नाल्याच्या पाण्यात तिने रिषभला बुडवून मारले. त्यानंतर, रिषभ काही हालचाल करत नसल्याचे कुटुंबीयांना सांगून तिने त्यास खासगी डॉक्टरकडे नेले. डॉक्टरने रिषभ मृत झाल्याचे सांगितल्याने धापशीपाडा, वाघिवली येथील पोलीसपाटील भगवान गडगे यांनी ही खबर तालुका पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून रिषभचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.शवविच्छेदनानंतर डॉक्टरांनी रिषभचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल पोलिसांना दिला. पोलिसांनी याबाबत रिषभच्या आदिवासी कुटुंबाची चौकशी केली. त्यावेळी त्याची आई कल्पनाने मुलाच्या सततच्या रडण्याला कंटाळून त्यास बुडवून मारल्याची कबुली दिली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात शनिवारी कल्पना गायकर हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी मातेला अटक केली आहे. तिला भिवंडी न्यायालयाने १३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा