शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

ठाणे  जिल्ह्यातील सहा हजार हेक्टरवरील पीक - जमीन नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 19:47 IST

जिल्ह्यात गेल्या महिन्यातील २६ व २७ जुलै या दोन दिवसांसह ४ आॅगस्ट च्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे नदी नाल्यांना पूर आला. या पुराच्या पाण्याचा निचरा वेळेत न झाल्यामुळे निवासी वस्त्यांमध्ये पाणी शिरले. यामुळे जिल्ह्यातील दहा हजार २७५ खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहेत. तर एक हजार ५१८ घरांची पूर्णत: तर काहींची अशंता पडझड झाली. जिल्ह्याभरात तब्बल २७ जणांचा या पूर आपत्तीत मृत्यू झाला. तर या अतिवृष्टीमुळे सहा हजार १०० कुटुंबांना व ५०० व्यक्तींना तात्पुरत्या स्वरूपात निराधार व्हावे लागले होते

ठळक मुद्देपाच हजार ८८७ हेक्टरवरील पिकांसह शेत जमिनीचे नुकसानपीक नुकसान पाहणी पथकाकडून शुक्रवारी, शनिवार या दोन दिवसांच्या कालावधीत पाच हजार ८०० हेक्टर पीकां नुकसानीची पाहणी केली. तर ८७ हेक्टर जमिनीची पाहणी

ठाणे : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पाच हजार ८८७ हेक्टरवरील पिकांसह शेत जमिनीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची वस्तुस्थितीची दोन दिवशीय पाहाणी केंद्रीय पथकाने आज ठिकठिकाणी जावून केली. शनिवारी पाऊस असतानाही छत्र्यांच्या सहाय्याने पथकातील अधिकाऱ्यांनी पीक व जमीन नुकसान पाहणी केली आहे.         केंद्र शासनाच्या या पीक नुकसान पाहणी पथकाकडून शुक्रवारी, शनिवार या दोन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील भात पिकासह शेत जमिनीच्या नुकसानीची पाहाणी केली. शुक्रवारी रायगडहून येताना या पथकास वाहतूक कोंडीचा फटका बसला. पेण जवळील अमरापूर परिसरात वाहतूक कोंडीत अडकले होते. तरी शुक्रवारी संध्याकाळी बारवी येथील विश्रामगृहात गेल्यानंतर पीक पाहणीचे प्रजेंटेशन जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना देऊन आज सकाळीच नियोजनानुसार अंबरनाथ तालुक्यातील कसगांव येथील पीक नुकसानीची पाहाणी केली.

          बदलापूर जवळील हेंदरेपाडा, रमेशनगर येथील नुकसान ग्रस्त घरांची पाहाणी या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.कल्याण तालुक्यातील आणे, वासुंद्री, कोंढेरी येथील भात पिकांच्या नुकसानीची पाहणी या केंद्रीय पथकाने केली. यामध्ये केंद्राच्या इलेक्ट्रीकल अ‍ॅथोरीटीचे सह संचालक ओम किशोर यांच्यासह केंद्रीय पाणी आयोगाचे संचालक मिलिंद पानपाटील , केंद्राच्या रस्ते वाहतूक महामार्गाचे अधिक्षक अभियंता संजय जैस्वाल, पीएफसीचे संचालक चित्तरंजन दास आदी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांसह ठाणेजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अंकूश माने, कृषी उपसंचालक सावंत, तालुका कृषी अधिकारी शिल्हा निखाडे, संजय पायस, रामचंद्र घुडे आदी अधिकारी या पीक, शेत जमीन नुकसान पाहणी पथकात सामाविष्ठ होते.        या केंद्रीय पाहणी पथकाने जिल्ह्यातील पाच हजार ८०० हेक्टर पीकां नुकसानीची पाहणी केली. तर ८७ हेक्टर शेत जमिनीच्या नुकसानीची देखील वस्तुस्थिती पाहणी या केंद्रीय पथकामने केली. या पाहणी दौऱ्यांत कल्याण तालुक्यात वसात- शेलवली येथील पीक नुसानीच्या पाहणीसह आणे व भिसोळ येथील घरांच्या आणि पिकांच्या नुकसानीची पाहणीचे नियोजन करण्यात आलेले होते. त्याुनसार या पथकाने पाहणी केली. यामध्य कल्याण तालुक्यातील वसुंद्री व सांगोडे येथील पीक नुकसान पाहणी देखील या दौऱ्यांत करण्यात आली. या पाहणीच्या वेळी मात्र पाऊस ठिकठिकाणी असतानाही छत्रीचा वापर करून भर पावसात संबंधीत शेत जमीन व पीक नुकसान शेतावर प्रत्यक्ष जावून करण्यात आल्याचे आढळून आले.        जिल्ह्यात गेल्या महिन्यातील २६ व २७ जुलै या दोन दिवसांसह ४ आॅगस्ट च्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे नदी नाल्यांना पूर आला. या पुराच्या पाण्याचा निचरा वेळेत न झाल्यामुळे निवासी वस्त्यांमध्ये पाणी शिरले. यामुळे जिल्ह्यातील दहा हजार २७५ खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहेत. तर एक हजार ५१८ घरांची पूर्णत: तर काहींची अशंता पडझड झाली. जिल्ह्याभरात तब्बल २७ जणांचा या पूर आपत्तीत मृत्यू झाला. तर या अतिवृष्टीमुळे सहा हजार १०० कुटुंबांना व ५०० व्यक्तींना तात्पुरत्या स्वरूपात निराधार व्हावे लागले होते. एवढेच नव्हे तर गायी, म्हशी, शेळ्यामंढ्या सारख्या १०४ जनावरे पुराच्या पाण्यात दगावली आहेत. तर सुमारे पाच हजार ८८७ हेक्टरवरील भातपीक नष्ठ झाले आहे. याशिवाय ८७ हेक्टरवरील शेत जमीन या पूरस्थितीत नापीक झाल्याची जिल्हह्यातील शेतकºयांकडून ऐकायला मिळत आहे.................फोटो - ३१ ठाणे केंद्रीय पथक

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी