घरफोडीतील सहा आरोपींना अटक

By Admin | Updated: November 13, 2014 22:42 IST2014-11-13T22:42:35+5:302014-11-13T22:42:35+5:30

अज्ञात इसमांनी 12 इन्व्हर्टर, 3 मॉनिटर व अन्य वस्तू असा सुमारे 1 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता,

Six accused arrested in the burglary | घरफोडीतील सहा आरोपींना अटक

घरफोडीतील सहा आरोपींना अटक

रेवदंडा : घोटवडे गावातील o्रीपाद बॅटरी लि. या कंपनीमधून मागील महिन्याच्या 28 तारखेला कंपनी बंद असताना घरफोडी करून अज्ञात इसमांनी 12 इन्व्हर्टर, 3 मॉनिटर व अन्य वस्तू असा सुमारे 1 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता, अशी फिर्याद चंद्रकांत गुरव, रा. थळ अलिबाग यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी या कंपनीच्या स्थापनेपासून जे कर्मचारी आहेत व त्यातील सोडून गेलेल्यांची यादी घेवून तपास सुरू केला. घरफोडी झाली त्यानंतर हाताचे ठसे व श्वानपथक आणून तपास केला होता. या यादीतील सोडून गेलेल्या कर्मचा:यांकडे तपास सुरू केल्यावर अक्षय पाटील (19) याची चौकशी करताना या घरफोडीचा छडा लागला. पोलिसांनी अक्षय पाटील, प्रणित पाटील (19), कैलास धुमाळ (35) तिघेही रा. o्रीगाव, ता. अलिबाग, सिद्धेश मोरे (22) रा. पोयनाड, ता. अलिबाग, मुद्ददीन मोमीन (32, रा. पेझारी ता. अलिबाग), भावेश कोटक (27) रा. पोयनाड यांना अटक केली असून मोमीन या आरोपीकडे चार बॅट:या, चोरीत वापरण्यात आलेले चारचाकी वाहन असा 5 लाख 34 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. 
अन्य माल लवकर ताब्यात घेतला जाईल, अशी पाटील यांना अपेक्षा असताना अन्य घरफोडय़ा या आरोपींमुळे उघडकीस येतील. या तपासात पोलीस उपनिरीक्षक आनंदराव मुळीक, एस. सी. कांबळे, जगताप, महेश लांगी, सचिन खैरनार या पोलीस कर्मचा:यांनी सहभाग घेतला. (वार्ताहर)

 

Web Title: Six accused arrested in the burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.