शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

बदलापूर प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 23:30 IST

दरम्यान, आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केल्याचे सांगण्यात आले.

Devendra Fadnavis  (Marathi News ) : बदलापूर शहरातील एका प्रसिद्ध शाळेत चार वर्षीय दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर आता बदलापूरसह राज्यातील जनतेतून संतापाची लाट पसरली आहे. आरोपीला कठोर शिक्षेची मागणी होत आहे. बदलापूर येथे संतप्त नागरिकांनी रेल्वेगाड्या रोखत आंदोलन केले. आज सकाळपासून बदलापूरातील रेल्वेसेवा ठप्प होते, ६ च्या सुमारास पुन्हा सुरळीत सुरू झाले. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. दरम्यान, आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शनमो़डवर आले आहेत, त्यांनी एसआयटी स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

"बदलापूर प्रकरणात कायद्याने चालावं लागणार, खटला फास्टट्रॅक कोर्टात वकील उज्ज्वल निकम चालवणार"

दरम्यान, आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केल्याचे सांगण्यात आले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर एसआयटी स्थापन करण्यात आली. महाराष्ट्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करुन बदलापूर प्रकरणातील पुढचा तपास करण्यात येणार आहे. 

तासभर आंदोलनकर्त्यांसोबत त्यांनी चर्चा केली

बदलापूरातील आंदोलनाला मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली. सुमारे तासभर आंदोलनकर्त्यांसोबत त्यांनी चर्चा केली. पण, आंदोलनकर्ते त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, या आंदोलनात अनेकजण माझी लाडकी बहीण योजनेचे बोर्ड घेऊन थांबले आहेत. हे कोणती लोक आहेत, असा सवालही महाजन यांनी केला. गृहमंत्री फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली आहे. ज्यांनी कारवाईला विलंब केला त्यांना निलंबित केले आहे. या आंदोलनात कोणाची लीडरशीप नाही, ते तरुण आहेत. त्यांचा राग योग्य आहे पण, अशी रेल्वेलाईन अडवणे चुकीचे आहे. आरोपीला लवकरात लवकर आपण शिक्षा देणार आहोत, असंही मंत्री गिरीश महाजन म्हणाले. 

"या आंदोलनात सहभागी असलेले लोक वेगवेगळ्या गावचे आहे, कोणाला समजवायचं, कोणही यात लीडरशीप करत नाही. त्यामुळे कोणाशी बोलायचं? आंदोलनकर्ते म्हणत आहेत की आताच्या आता आरोपीला फाशी द्या, पण कायद्यात असं कुठेही नाही. आपल्याला कायद्याने चालावे लागणार आहे, सीसीटीव्ही डिलिट केले आहेत. हे प्रकरण फास्टट्रॅकमध्ये टाकण्यात आले आहे, असंही मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.   

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस